एक्स्प्लोर

Sulochana Latkar: अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली; सुलोचना दीदी अनंतात विलीन

सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Sulochana Latkar: ज्येष्ठ अभिनेत्री  सुलोचना लाटकर  (Sulochana Latkar) यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना दीदींना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुलोचना दीदींचे अंत्यदर्शन घेतले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,'सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे.त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती.'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

राज्यशासनाच्या वतीने सुलोचना दीदींना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली". 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे. सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली होती. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली.  

250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये सुलोचना दीदी  यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 

संबंधित बातम्या

Sulochana Latkar : "सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं पार्थिवाचे अंत्यदर्शन

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: 'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
Ramayana Actor Ranbir Kapoor Mistake In Speech: 'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी, घडलं काय?
'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
Embed widget