Rakhi Sawant On Adil : "आदिल ड्रायव्हर आहे, झोपडपट्टीत राहतो"; सत्य समोर येताच राखी हादरली
Rakhi Sawant : राखीचा पती आदिल हा ड्रायव्हर असून तो झोपडपट्टीत राहतो हे सत्य आता राखीसमोर आलं आहे.
![Rakhi Sawant On Adil : Actress Rakhi Sawant On Adil khan Durrani know latest update Marathi News Rakhi Sawant On Adil :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/90ddfc5b952919ecb8e5073117e683ed1677215525246254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakhi Sawant On Adil Khan Durrani : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी राखी आदिलसोबत लग्नबंधनात अडकली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री त्याच्या पतीबद्दल नव-नवीन खुलासे करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राखी म्हणाली की, "आदिल शोरुमचा मालक नसून ड्रायव्हर आहे".
आदिल खानसोबत लग्न केल्यानंतर राखी म्हणाली होती की, "आदिल बंगळुरूमधील एका शोरुमचा मालक आहे. तसेच त्याने माझ्यासाठी दुबईत एक नवी कार खरेदी केली आहे". राखी सावंतने मे 2022 मध्ये आदिल खानसोबत लग्न केलं होतं. पण आता आदिलने तिची फसवणूक केल्याने राखीने आदिल विरोधात तक्रार दाखल केली असल्याचा दावा राखी वारंवार करतेय.
राखी सावंत काय म्हणाली? (Rakhi Sawant Video Viral)
राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. रडता रडता राखी म्हणतेय की, "आदिल एक ड्रायव्हर आहे आणि तो झोपडपट्टीत राहतो. मला माहीत नव्हतं की, तो अब्बास जीचा ड्रायव्हर आहे".
View this post on Instagram
राखी पुढे म्हणाली, "मी आदिलचं घर पाहायला गेले तेव्हा मला कळलं की, तो झोपडपट्टीत राहतो. तो गरीब आहे याची मला अडचण नाही, पण किमान त्याने मला खरं सांगायला हवं होतं. आदिलने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. देवा... कुठे आहेस तू".
राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतीच मैसूरला तिच्या सारसी गेली होती. त्यावेळी आदिल ड्रायव्हर आहे आणि तो झोपडपट्टीत राहतो हे राखीला कळलं. सत्य कळल्यानंतर राखीला मोठा धक्का बसला आहे. राखीच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. राखी सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Mrathi) माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. राखीची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. राखी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीमुळे राखीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rakhi Sawant ON Adil Khan : आदिलने तुरुंगातून राखी सावंतला दिली धमकी; म्हणाला, "मी पुन्हा येईन आणि..."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)