(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakhi Sawant ON Adil Khan : आदिलने तुरुंगातून राखी सावंतला दिली धमकी; म्हणाला, "मी पुन्हा येईन आणि..."
Rakhi Sawant : 'एंटरटेनमेंट क्वीन' राखी सावंतला तिच्या पतीने म्हणजेच आदिल खान दुर्रानीने तुरुंगातून धमकी दिली आहे.
Adil Khan Durrani Threatens Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती अर्थात आदिल खान दुर्रानीसोबतच्या (Adil Khan Durrani) नात्यामुळे चर्चेत आहे. आदिल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला जामीन मिळू नये यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान, राखी 20 फेब्रुवारीला तिच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली होती. त्यावेळी आदिलने तिला धमकावल्याचा दावाही राखीने केला आहे.
आदिलने राखीला दिली धमकी (Adil Khan Durrani threatened Rakhi Sawant)
राखी सावंतने नुकतीच आदिलची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आदिल खान तिला काय म्हणाला याबद्दल बोलताना राखी म्हणाली, "आज मी तुरुंगात आहे. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. आर्थर रोड तुरुंगासारखं घाणेरडं तुरुंग मी आजवर पाहिलेलं नाही. इथे मी भांडी घासली आहेत. लोकांसाठी चहा बनवला आहे. त्यांचे पाय चेपून दिले आहेत. मला मारहाणही झाली आहे. यासर्व गोष्टींचा बदला घ्यायला मी पुन्हा येईन. लवकरच माझी सुटका होईल. मग बघ तुझं काय होईल".
View this post on Instagram
राखी पुढे म्हणाली, "आता यापेक्षा माझं काय वाईट होऊ शकत नाही. खरंतर मी एक जिवंत प्रेत आहे. लग्नानंतर आदिल माझ्यासमोर त्याच्या मैत्रिणीला माझी प्रेयसी, माझं प्रेम असं म्हणत असे. तसेच तो तिला म्हणाला होता, 'राखीचे सर्व पैसे मी घेईल आणि नंतर तिला सोडेल'. माझं आदिलसोबत लग्न झालं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. तेव्हा मला वाटलेलं आता माझं लग्न झालं आहे. आता लवकरच मी आईदेखील होईल. आता माझी ही इच्छा अपूर्ण राहिली आहे".
आदिल खानची होणार सुटका?
राखी सावंत 2022 साली आदिल खान दुर्रानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. आदिल हा मैसूरचा रहिवासी असून तिथेही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मैसूर पोलीसदेखील त्याला ताब्यात घेऊ शकतात, असा राखी सावंतचा दावा आहे. तसेच, लग्न केल्यापासून आदिल खान दुर्रानी तिला त्रास द्यायचा. मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करायचा, असा आरोपही राखी सावंतने केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :