एक्स्प्लोर

फिट टू फॅट, अभिनेता उदय चोप्रा आता असा दिसतो!

2013 मध्ये आलेल्या 'धूम-3' नंतर उदय चोप्रा कोणत्याही सिनेमात दिसला नाही.

मुंबई : 'मोहब्बतें' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता उदय चोप्राला फारसं यश मिळालं नाही, पण तो चर्चेत मात्र राहिला. मात्र नुकतेच त्याचे काही फोटो समोर आले जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का जरुर बसेल. इम्रान हाश्मीच्या वांद्र्यातील घराबाहेर असताना उदय चोप्रा कॅमेऱ्यात कैद झाला. बऱ्याच काळाने कॅमेऱ्यासमोर आलेल्या उदय चोप्राचा लूक फारच बदलला आहे, शिवाय त्याचं वजनही वाढलं आहे. इतकंच नाही तर दाढीही पांढरी झाली आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये असलेल्या उदयने टोपी घातली होती. त्यामुळे एक क्षण हाच उदय चोप्रा आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. Uday_Chopra_1 सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकची थट्टा होत आहे. दंगल 2 मध्ये उदय चोप्रा आमीर खानला रिप्लेस करणार असल्याचं ट्वीट काहींनी केलं आहे. तर मोदींच्या बायोपिकसाठी उदय चोप्रा योग्य चॉईस असल्याचं काहींनी म्हटलं आहे. https://twitter.com/Iam_PrinceVij/status/915570500872552448 https://twitter.com/UberHandle/status/916018518079848448 2013 मध्ये आलेल्या 'धूम-3' नंतर उदय चोप्रा कोणत्याही सिनेमात दिसला नाही. Uday_Chopra_6 असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात उदय चोप्राने  1991 मध्ये आलेल्या 'लम्हे' सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 2000 मध्ये 'मोहब्बतें' सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केलं. त्याने 'मेरे यार की शादी है' (2002), 'धूम' (2004), 'नील अँड निक्की' (2005), 'धूम 2' (2006), 'धूम 3' (2013) या सिनेमात काम केलं आहे. 2012 मध्ये स्वत:च्या कंपनीची सुरुवात उदय चोप्राने 2012 मध्ये 'योमिक' कंपनीची स्थापना केली. तो यशराज फिल्म्सचा मॅनेजरही आहे. 2014 मधील 'ग्रेस ऑफ मोनॅको' आणि 'द लॉन्गेस्ट वीक' या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या सिनेमातून यशराज एन्टरटेन्मेंटने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. उदय चोप्रा  यश चोप्रा यांचा मुलगा आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ आहे. नर्गिस फाखरीसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत उदय त्याच्या सिनेमांपेक्षा रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत राहिला. अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत तिचं नाव जोडलं होतं. दोघेही गोव्यात सीक्रेट व्हेकेशन करताना दिसले होते. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget