एक्स्प्लोर
'सरबजीत'च्या दमदार भूमिकेत असलेला रणदीप एकेकाळी टॅक्सी चालवायचा!
रोहतक : रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय यांच्या सरबजीत या सिनेमाच ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये दोघांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळतो. मात्र या रणदीप हुडाच्या लूककडे लक्ष वेधलं जातं. सदृढ ते खंगलेला सरबजीत असा त्याच्यातील बदल अतिशय प्रकर्षाने जाणवतो.
एकेकाळी ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालवणाऱ्या रणदीप हुडाची गणना बॉलिवूडमधल्या चांगल्या अभिनेत्यांमध्ये होते. मात्र त्याच्या क्षमतेसारखा सिनेमा अजूनपर्यंत त्याला मिळाला नव्हता. पण आता 'सरबजीत'मध्ये त्याचं काम दमदार असणार हे नक्की. 'सरबजीत'च्या भूमिकेसाठी रणदीप हुडाने तब्बल 28 किलो वजन कमी केलं.
कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात चित्रपटसृष्टीत
पण रणदीपने अभिनेता व्हावं, हे त्याच्या कुटुबीयांना मान्य नव्हतं. हरियाणाच्या रणदीप हुडा कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय वेगळी आहे.
रणदीप हुडाचा जन्म हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात झाला. रणदीपची आई आशा हुडा भाजपच्या नेत्या आणि समाजसेविका होत्या. तर वडील रणबीर हुडा सर्जन होते. बहिणही डॉक्टर असून भाऊ संदीप हुड्डा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो सिंगापूरमध्ये राहतो.
ऑस्ट्रेलियात मार्केटिंगची पदवी
एका मुलाखतीत रणदीपने सांगितलं की, कुटुंबीयांना त्याला डॉक्टर बनवायचं होतं, त्यामुळे त्यांनी त्याला दिल्लीच्या डीपीएस शाळेत प्रवेश घेऊन दिला. पण रणदीपला डॉक्टर बनण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो शिक्षणासाठी परदेशात गेला. मेलबर्नमध्ये त्याने मार्केंटिंगची पदवी मिळवली याचवेळी त्याला अभिनयामध्ये अधिक आवड निर्माण झाली. मेलबर्नमधून परतल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
पैशांसाठी टॅक्सी चालवायचो : रणदीप
शिक्षणसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या रणदीप हुडाने पैशांच्या कमतरतेमुळे टॅक्सी चालवली आहे. एवढंच नाही तर पैसे मिळवण्यासाठी त्याने एका चायनिज रेस्टॉरंटमध्येही काम केलं आहे. याशिवाय कार धुण्याचं कामही तो करत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement