Ranbir Kapoor Expensive Gift: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीरनं आलियाला दिलं खास गिफ्ट? किंमत ऐकून व्हाल अवाक्!
काही दिवसांपूर्वी रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं.
Ranbir Kapoor Expensive Gift: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं. अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरने त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियासाठी लंडनहून खास गिफ्ट आणले. या गिफ्टची किंमत जाणून तुम्ही अवाक् व्हाल.
रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतताना विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्या हातात एक हँडबॅग दिसली. ही हँडबॅग रणबीरनं आलियासाठी घेतली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
View this post on Instagram
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांचे नवे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. यावेळी आलियाच्या हातात एक हँडबॅग दिसली. रणबीरने आलियाला ही हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. या हँडबॅगची किंमत 12,250 डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
View this post on Instagram
रणबीर आणि आलियाचे चित्रपट
रणबीरचा लवकरच अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून तो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह आणि धर्मेंद्र हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: