एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली. https://twitter.com/PMOIndia/status/817221430974652416 जबरदस्त संवादफेक, भारदस्त आवाज आणि अभिनयातील अलौकिक लकब यामुळे ओम पुरी यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ओम पुरी यांचा 'आक्रोश' हा सिनेमा अतिशय गाजला होता. आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या जबरदस्त सिनेमांना, ओम पुरींच्या अभिनयाचा परिसस्पर्श लाभला. भूमिका मग ती विलनची असो वा हिरोची, कॉमेडी असो वा संवेदनशील राखट चेहऱ्याच्या ओम पुरींनी सर्व भूमिका सहज साकारल्या. 'घाशीराम कोतवाल'मधून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. चायना गेटमधील रिटायर्ड फौजी, घायलमधील एसीपी डिसुझा, हेराफेरीमधला खडकसिंग, चुपचुपकेमधील प्रभातसिंह चौहान या सर्व भूमिका ओम पुरींनी गाजवल्या. इतकंच नाही तर जाने भी दो यारो या सिनेमातील बिल्डर अहुजा आणि 'आस्था'मधील प्रोफेसर अमरला कोणीही विसरु शकणार नाही. ओम पुरी यांची कारकीर्द ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये हरियाणामध्ये झाला होता. आपलं प्राथमिक शिक्षण त्यांनी ननिहाल पंजाबच्या पटियालामधून पूर्ण केलं होतं. 1976 साली पुण्यातील एफटीआयमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वत:चा थिएटर ग्रुप 'मजमा'ची स्थापना केली होती. ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकीर्दीची सुरुवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा 'घाशीराम कोतवाल'पासून सुरुवात केली होती. 1980 साली आलेल्या 'आक्रोश' सिनेमानं त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली. आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका फारच गाजली होती. ‘अर्धसत्य’, ‘जाने भी दो यारों’, ‘नसूर’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘देहली 6’, ‘मालामाल वीकली’, ‘डॉन’, ‘रंग दे बसंती’, ‘दीवाने हुए पागल’, ‘क्यूँ ! हो गया ना’, ‘काश आप हमारे होते’ आणि ‘प्यार दीवाना होता है’ यासारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये त्यांनी खास भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 124 सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 1993 साली ओम पुरी यांचं नंदिता पुरी यांच्याशी लग्न झालं होतं. पण 2013 साली ते विभक्त झाले होते. ओम पुरी यांचा एक मुलगा असून त्याचं नाव इशान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Embed widget