एक्स्प्लोर
Oscars : ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली
![Oscars : ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली Academy Awards 2017 Pay Tribute To Om Puri Oscars : ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/27150222/om-puri.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कॅलिफोर्निया : 'ईस्ट इज ईस्ट', 'गांधी', 'सिटी ऑफ जॉय' आणि 'वूल्फ' अशा लोकप्रिय सिनेमात काम केलेले दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये 89 वा ऑस्कर सोहळा पार पडला.
ओम पुरींना ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांच्यासोबत श्रद्धांजली वाहण्यात आली.
सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ओम पुरींनी 'गांधी' या सिनेमातून आंतरराष्ट्रीय सिनेमात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी 'ईस्ट इज ईस्ट', 'माय सल दी फॅनेटिक' आणि 'दी पॅरोल ऑफिसर' अशा सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची आणि भारदार आवाजाची छाप सोडली.
संबंधित बातमी : ऑस्कर घोळ, 'ला ला लॅण्ड'चा पुरस्कार काढून घेतला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)