एक्स्प्लोर
... म्हणून आमीर खानने नाक आणि कान टोचलं!
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या दंगल सिनेमाच्या चीनमधील कमाईवरुन चर्चेत आहे. पण दुसरीकडे त्याचा आगामी सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या शूटिंगसाठीही मोठी लगबग सुरु आहे. या सिनेमात आमीर प्रमुख भूमिका साकारत असून, सिनेमासाठी त्याने आपले नाक आणि कान टोचलं आहे. विशेष म्हणजे, यामुळे तो कित्येक रात्र नीट झोपू देखील शकला नाही.
आमीर खान त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमात वेगळ्याच लुकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो एका बंडखोराची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील त्याच्या व्यक्तीरेखेसाठी त्याने नाक आणि कान टोचलं असून, यामुळे तो कित्येक दिवस झोपूही शकला नसल्याची माहिती मिळत आहे.
आमीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नाक आणि कान टोचलेला फोटो शेअर केला आहे
. या फोटोत आमीर खान नाकात नथ आणि कानात बली घातल्याचं दिसत आहे.
आमीरच्या या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यात कतरिना कैफ, फातिमा शेख याही प्रमुख भूमिका साकारत आहेत. सध्या कतरिना तिच्या आगामी जग्गा जासूस सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तरीही यातून वेळ काढून 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या शूटिंगसाठी नुकतीच माल्टामध्ये दाखल झाली होती. यशराज बॅनर खाली या सिनेमाची निर्मिती होत असून, सिनेमाचं दिग्दर्शन विजय कृष्णा अचार्य यांनी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement