एक्स्प्लोर
'सैराट' पाहून आमीर खान भावनाविवश

मुंबई : ज्या चित्रपटाने महाराष्ट्रासह भारताला वेड लावलं आहे, तो 'सैराट' पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानही निःशब्द झाला आहे. आमीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 'नुकताच सैराट पाहिला. माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या धक्क्यातून अजून सावरतोय.' असं आमीरने पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/aamir_khan/status/729724678877511680 दुसऱ्या ट्वीटमधून आमीरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतद्वयी अजय अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख या गुणी अभिनेत्यांचंही कौतुक केलं आहे. सैराटच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांसह झीचं अभिनंदन, असं आमीरने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/aamir_khan/status/729724733160194050 विशेष म्हणजे तिसऱ्या ट्वीटमध्ये आमीरने अद्यापही 'सैराट' न पाहिलेल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. https://twitter.com/aamir_khan/status/729724808280182784
संबंधित बातम्या :
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
"हॅलो, आर्ची अभिनंदन'!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय"
सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
‘सैराट’ची पहिल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
आणखी वाचा























