एक्स्प्लोर

Aamir Khan Birthday: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात आमिरला करायचं होतं काम; असा झाला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'

Aamir Khan Birthday Special : आमिर खानचा (Aamir Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात त्याच्या करिअरबाबत...

Aamir Khan Birthday Special : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आज त्याचा 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण आमिरच्या बालपणाबद्दल अनेकांना माहित नसेल. आमिरने वयाच्या आठव्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. जाणून घेऊयात आमिरबद्दल काही खास गोष्टी...

बालकलाकार म्हणून केलं काम

आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईमध्ये झाला. आमिरने 1973 मध्ये 'यादों की बारात' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. आमिरने अभिनयक्षेत्रात काम करावं, असं त्याच्या वडिलांना वाटत नव्हतं. पण आमिरने अवन्तर नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात त्याने पहिल्यांदा हिरोची भूमिका साकारली. 

अभिनय नाही तर या क्षेत्रात आमिरला करायचं होतं काम

आमिरला बालपणी टेनिस खेळायला खूप आवडत होते. त्याला टेनिस प्लेअर व्हायचे होते. तो शाळेत असताना टेनिस चांगला खेळायचा. त्याने शाळेत असताना राज्यस्तरीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता.  रोजर फेडरर हा आमिरचा आवडता खेळाडू आहे. 

'कयामत से कयामत तक' या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटाचं बजेट कमी होतं. त्यामुळे आमिरने स्वत:च या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा आणि बसच्या मागे लावण्याचे काम केले. काही दिवसांपूर्वी आमिरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आमिर हा रिक्षाच्या मागे चित्रपटाचे पोस्टर लावताना दिसत होता. 

आमिरने हिट चित्रपटांमध्ये केलं काम

आमिर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. मन, इश्क, गुलाम, फना, तारे जमीन पर या चित्रपटांमध्ये आमिरने काम केलं. त्याच्या लगान, दंगल, पीके आणि थ्री इडियट्स या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याच्या अनेक चित्रपटांनी 100 कोटींच्या क्लबचा टप्पा गाठला होता. आमिर चित्रपटांचे शूटिंगच्या वेळी मन लावून काम करतो. अनेक वेळा तो इतर कलाकारांना गाइडन्स देतो. त्याच्या अभिनयाचं देखील अनेक जण कौतुक करतात. त्यामुळे आमिरला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हटलं जातं. 

गेल्या वर्षी त्याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. या चित्रपटात आमिरसोबतच करीना कपूर, मोना सिंह आणि नागा चैतन्य यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता आमिरचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Aamir Khan: आमिर खाननं केलं कलश पूजन, किरणसोबत केली आरती; फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget