(Source: ECI/ABP News/ABP Majha)
83 First Song : Ranveer Singh च्या '83' सिनेमातील 'लेहरा दो' गाण्याचा टीझर आऊट
Ranveer Singh : रणवीर सिंहच्या आगामी '83' सिनेमातील 'लेहरा दो' या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
83 First Song : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) आगामी '83' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या टीझरच्या माध्यमातून रणवीरच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमात रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून सिनेमातील पहिल्या गाण्यचा टीझर प्रदर्शित केला आहे.
टीझरच्या माध्यमातून देशभक्तीपर गाण्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत रणवीरने लिहिले आहे,"तिरंगा उंच उंच उडवत राहा". '83' सिनेमा भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे. टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. ते या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
Keep the tricolour flying high! #LehraDo teaser out now.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) December 5, 2021
Song out tomorrow.#ThisIs83 pic.twitter.com/jCtlI0INxq
सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्या मुख्य भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे. दीपिका या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 डिसेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता
कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. बऱ्याच वेळा चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अडचण होती. यंदाही हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha