Popular Documentries on OTT: "द हंट फॉर वीरप्पन" ते "इंडियन प्रीडेटर"; वीकेंडला पाहा शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या ओटीटीवरील 'या' डॉक्युमेंट्री
थ्रिलर आणि सस्पेन्स असणाऱ्या नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील डॉक्युमेंट्रींबाबत जाणून घेऊयात...
Popular Documentries on OTT: ओटीटीवर (OTT) वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होतात.अनेक लोक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. ओटीटीवरील डॉक्युमेंट्रींना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाते. थ्रिलर आणि सस्पेन्स असणाऱ्या नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील डॉक्युमेंट्रींबाबत जाणून घेऊयात...
हाऊस ऑफ सीक्रेट्स: द बुराडी डेथ (House of Secrets: The Burari Deaths)
हाऊस ऑफ सीक्रेट्स: द बुराडी डेथ ही डॉक्युमेंट्री तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वीकेंडला पाहू शकता. या डॉक्युमेंट्रीचे कथानक दिल्लीच्या बुरारी भागातील घटनेवर आधारित आहे. जिथे एकाच घरातील 11 जणांचा मृत्यू होतो.
इंडियन प्रीडेटर- द बुचर ऑफ दिल्ली (Indian Predator: The Butcher of Delhi)
इंडियन प्रीडेटर- द बुचर ऑफ दिल्ली या डॉक्युमेंट्रीची कथा चंद्रकांत झा नावाच्या सीरियल किलरवर आधारित आहे. ही गोष्ट आहे 2006-7 सालची जेव्हा या व्यक्तीने काही लोकांचा मर्डर केला होता.
इंडियन प्रीडेटर- मर्डर इन अ कोर्ट रूम (Indian Predator: Murder in a Courtroom)
इंडियन प्रीडेटर- मर्डर इन अ कोर्ट रूम या डॉक्युमेंट्रीमध्ये 40 हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या अक्कू यादवची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्री सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं. गेल्या वर्षी ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.
A serial killer murdered by his victims, was it revenge or remission?
— Netflix India (@NetflixIndia) October 7, 2022
Find out on Indian Predator Season 3, premiering on 28th October. pic.twitter.com/ArFDCgY2rE
मुंबई माफिया: पोलीस वर्सेस अंडरवर्ल्ड (Mumbai Mafia: Police vs Underworld)
या डॉक्युमेंटरीमध्ये 90 च्या दशकातील कथा दाखवण्यात आली आहे. त्या काळात संपूर्ण मुंबई कशी अंडरवर्ल्डच्या ताब्यात होती, ते सांगते.
द हंट फॉर वीरप्पन (The Hunt for Veerappan)
द हंट फॉर वीरप्पन ही नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग डॉक्युमेंटरी आहे. यामध्ये वीरप्पनला पकडण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही डॉक्युमेंटरी यावर्षी 4 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या डॉक्युमेंटरीमध्ये एकूण चार एपिसोड आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या :