एक्स्प्लोर
बीग बींकडून 29 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर, आमीर म्हणाला आयला!
या फोटोवर आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हा फोटो रिपोस्ट करत 'आयला! अमर आणि प्रेम दोन लिजेंड्ससोबत, ते ही वेम्बली मैदानावर! धन्यवाद सर या फोटोसाठी,' असं लिहिलं आहे.

मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात. ते सध्या काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्यामागचा संदर्भ सांगत आहेत. त्यांनी नुकताच एक फोटो अपलोड केला असून त्यात त अभिनेत्री श्रीदेवी, आमीर खान आणि सलमान खान त्यांच्यासोबत दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर चौघांचा हा फोटो शेअर केला. 'लंडनमधील फुटबॉलच्या वेम्बली मैदानावर माझा कॉन्सर्ट होता तेव्हाचा हा फोटो आहे. हा पहिला कॉन्सर्ट होता जिथे एका भारतीयाने सादरीकरण केले होते,' असं त्यांनी फोटो शेअर करताना लिहिलं आहे. त्यावेळी मी माझ्यासोबत श्रीदेवी, आमीर खान आणि सलमान खानला यांना नेलं होतं. या माझ्या कार्यक्रमाला 70 हजार प्रेक्षक होते, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. हा फोटो 1989 मध्ये काढल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
या फोटोवर आमीर खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हा फोटो रिपोस्ट करत 'आयला! अमर आणि प्रेम दोन लिजेंड्ससोबत, ते ही वेम्बली मैदानावर! धन्यवाद सर या फोटोसाठी,' असं लिहिलं आहे.
नुकताच अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हे दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. मात्र मोठे कलाकार असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























