अखेर ‘83’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला. कलाविश्वाचाही यात समावेश होता. मागील वर्षी प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या किंवा चित्रीकरण प्रक्रिया पूर्ण झालेल्या अनेक चित्रपटांना याचा फटका बसला होता
मुंबई : कोरोना काळातील संकटानंतर अखेर जीवनाचा गाडा पूर्ववत होत आहे. त्यातच अनेक नियमांना शिथिलताही मिळाली आहे. याच धर्तीवर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी अनेक कलाकारांनी पुन्हा एकदा त्यांच्या आगामी चित्रपटांच्या आणि प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.
कलाविश्वात या चित्रपटांच्या गर्दीत सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी ‘83’ या चित्रपटाची. भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 मधील विश्वचषक विजयाच्या प्रवासापर्यंतची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनामुं लांबल्यानंतर अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला आहे.
माध्यमं आणि कलाविश्वात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार हा मल्टीस्टारर चित्रपट 25 जून 2021ला प्रदर्शिक केला जाणार आहे. चित्रपटाती एकूण स्टारकास्ट, दिग्दर्शन आणि इतरही काही मुद्दे पाहता 2021 या वर्षातील काही बड्या चित्रपटांमध्ये ‘83’चा समावेश होत आहे.
IND vs ENG 1st Test highlights | भारतापुढं पहिल्या कसोटी विजयासाठी 381 धावांचं आव्हान
एप्रिल महिन्यात खिलाडी कुमारचा 'सुर्यवंशी' आणि रमजानच्या दिवसांमध्ये सलमान खानचा 'राधे' प्रदर्शित होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळंच ‘83’च्या प्रदर्शनाची तारीख 25 जूनपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘83’च्या निमित्तानं रणवीर सिंह आणि त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच लग्नानंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळं प्रेक्षकांसाठी ही परवणीच ठरणार आहे.