Irrfan Khan : प्रथम स्मृतीदिनी जाणून घेऊया इरफान खान यांची कधीही न पाहिलेली बाजू
एक कलाकार म्हणून ते संपन्न होतेच, पण एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी कायमच या कलाविश्वात आपलं वेगळं स्थान प्रस्थापित केल्याचं दिसून आलं
Irrfan Khan : बॉलिवूड आणि ह़ॉलिवूड, थोडक्यात काय तर संपूर्ण अभिनय विश्वात आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता इरफान खान यांना विशेष ओळखीची गरजच नाही. इरफान खान आज आपल्यात नसले तरीही त्यांनी सादर केलेल्या कलेच्या माध्यमातून मात्र ते प्रत्येकाच्याच मनात घर करुन आहेत. जीवनात संघर्षाला न मुकलेला या अभिनेता कारकिर्दीत बरीच यशशिखरं गाठून गेला. 29 एप्रिल 2020 या दिवशी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अर्थातच कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली. आपण एका मोठ्या कलाकाराला, त्याहून एका चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे यावर कित्येकांचा विश्वासच बसत नव्हता.
इरफान खान यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला होता. पण, या अभिनेत्याच्या आठवणींच्या रुपानं कुटुंबानं त्यांचं अस्तित्व जोपासलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून इरफान यांचे कुटुंबीय कायमच त्यांची एक वेगळी बाजू चाहत्यांच्या भेटीला आणत असतात. कधी काळजी करणारे वडील, कधी नितांत प्रेम करणारा पती, कधी एक मित्र, तर कधी मार्गदर्शक अशा बहुविध भूमिकांमध्ये इरफान त्यांच्या कुटुंबाची साथ आजही देत आहेत. चला तर मग, सोशल मीडियाच्याच माध्यमातून पाहूया इरफान खान यांच्या खासगी जीवनाचा कारवाँ...
कुटुंबासमवेतचे काही खास क्षण...
View this post on Instagram
View this post on Instagram
कधी पाहिलं आहे इरफान खान यांना गाणं गाताना?
View this post on Instagram
यांचं खाण्यावरचं प्रेमही काही लपून राहिलं नव्हतं...
View this post on Instagram
'मकबूल', 'द लंच बॉ़क्स', 'पान सिंह तोमर', 'हासिल', 'लाईफ ऑफ पाय', 'अंग्रेजी मीडियम', 'करीब करीब सिंगल', 'कारवाँ', 'पीकू' या आणि अशा कित्येक चित्रपटातील विविध भूमिकांच्या माध्यमातून इरफान खान आजही प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत.