Bobby Deol On Intimate Scene In Aashram 3: 'घाबरलेलो... घाम फुटलेला...'; 'आश्रम'मधला ईशा गुप्तासोबतचा 'तो' इंटिमेट सीन अन् बॉबी देओलची अवस्था होती फारच वाईट
Bobby Deol On Intimate Scene In Aashram 3: बॉबी देओलनं हे बोल्ड, इंटिमेट सीन्स कसे शूट केले? याबाबत चर्चा रंगलेल्या, अशातच आता बॉबी देओलनं स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Bobby Deol On Intimate Scene With Esha Gupta In Aashram 3: बॉबी देओल (Bobby Deol) सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलेल्या बॉबी देओलला तेव्हा जे फेम मिळालं नाही, ते आता साठीच्या उंबरठ्यावर उभं राहिल्यावर मिळालं आहे. आश्रम वेब सीरिज (Aashram Web Series), अॅनिमल यांमुळे बॉबी देओल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आणि सर्वांना भावला. नुकताच तो आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसलेला. आता तो अनेक नवनव्या अंदाजात चाहत्यांसमोर येतोय. असं असलं तरीसुद्धा त्याची वेब सीरिज आश्रम हिट झालेली. या सीरिजमध्ये त्यानं बाबा निराला ही भूमिका साकारलेली. त्याच्या भूमिकेबाबत जी गोष्ट सर्वात चर्चिली गेली, ती म्हणजे त्यानं दिलेले इंटिमेट सीन्स. आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्ये ईशा गुप्तासोबतच्या (Esha Gupta) त्याच्या रोमँटिक सीन्सनं चाहत्यांना थक्क केलं.
बॉबी देओलनं हे बोल्ड, इंटिमेट सीन्स कसे शूट केले? याबाबत चर्चा रंगलेल्या, अशातच आता बॉबी देओलनं स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन्स शूट करताना त्याची अवस्था खूपच वाईट झालेली, असं त्यानं कबुल केलंय.
View this post on Instagram
बॉबी देओल काय म्हणाला? (Bobby Deol On Intimate Scene In Aashram 3)
स्पॉटबॉयशी बोलताना बॉबी देओलनं ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन्स शूट करताना नर्व्हस झालेलो, घाबरलो होतो. मला घाम फुटलेला, असं सांगितलं आहे. बॉबी देओल म्हणाला की, "ईशा एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळते. जेव्हा आम्ही इंटिमेट सीनचं शूटिंग करत होतो तेव्हा खूप नर्व्हस होतो. पण ईशाने मला कंमर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मी चांगल्या प्रकारे माझे सीन्स देऊ शकलो. मला वाटतं म्हणूनच लोकांनाही ते सीन्स आवडले".
दरम्यान, आतापर्यंत आश्रमचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि तिसऱ्या सीझननं सर्वाधिक लक्ष वेधलं. 'एक बदनाम: आश्रम 3'मध्ये बॉबी आणि ईशा यांच्यातले अनेक इंटिमेट सीन्स आहे. ज्याची जोरदार चर्चा रंगलेली. चाहते आता पुढच्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
















