आला रे आला..!! बिग बॉस मराठी 6 चा टिझर आला..; लाडक्या रितेश भाऊचा लय भारी धमाका पाहिलात का?
Bigg Boss marathi 6: टिझर शेअर होताक्षणी या व्हिडिओला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bigg Boss Marathi 6 Teaser: सलमान खान होस्ट असलेल्या हिंदी बिग बॉस 19 चा शेवट झाल्यानंतर आता मराठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे बिग बॉस मराठी सीजन 6 कधी सुरू होतोय याची. कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या मराठी बिग बॉसचे दणक्यात प्रमोशन सुरू आहे. हळूहळू एक एक क्लू बाहेर येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीजन कधी सुरू होतोय याची आतुरतेने वाट पाहत असताना आता महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ प्रेक्षकांसमोर आलाय एका लई भारी टिझरमधून. टिझर शेअर होताक्षणी या व्हिडिओला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लवकर सुरू करा अशी मागणी या टिझरखाली चाहते करतायत.
नेमकं काय आहे टिझरमध्ये?
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या टीझरमध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रितेश बिग बॉस होस्ट करण्यासाठी तयार होताना दिसतोय. दारात रांगोळी काढली जातेय. पताका उंचावल्या जात आहेत. ढोल ताशे सज्ज होत आहेत. एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं या टीझरमधून कळतंय. बिग बॉस मराठी लवकरच असं या टीझरनंतर लिहिलं आहे.
View this post on Instagram
चाहत्यांची उत्सुकता वाढली
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. या सीजनचा विजेता सूरज चव्हाण व इतर स्पर्धकही चाहत्यांच्या मनात राहिले आहेत. बिग बॉस 19 संपल्यानंतर बिग बॉसच्या मंचावर अभिनेता रितेश देशमुख गेल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सलमान खानने बिग बॉस मराठी सुरू होत असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली. कलर्स मराठी ने शेअर केलेले अनेक प्रोमो प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यावर्षीची थीम दरवाजांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी बिग बॉसमध्ये कोणाला संधी मिळणार? कोणाच्या नशिबाची किल्ली फिरणार? याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळण्याची शक्यता आहे. भाऊचा कट्टा पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना बिग बॉस मराठीचा पुनरागमनाचे वेध लागले आहेत. बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच कलर्स मराठी आणि jio हॉटस्टारवर पाहता येणार आहे.























