Abhijeet Sawant: बिग बॉस मराठी फेम अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज; इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज
Abhijeet Sawant New Song: तरुणाईला सुमधुर आवाजनं वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजे, अभिजीत सावंत. फक्त संगीताची जादू नाही, तर त्यानं बिग बॉस सारख्या रियालिटी शोमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

Abhijeet Sawant New Song Chaal Turu Turu: फर्स्ट इंडियन आयडॉल (Indian Idol) आणि बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi Season 5) चा फर्स्ट रनरअप गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) महाराष्ट्रातील अनेकांच्या गळ्यातील ताईत. मराठमोळा अभिजीत सावंत आपल्या गोड गळ्यानं नेहमीच मंत्रमुग्ध करत असतो. अशातच आता महाराष्ट्राचा लाडका गायक अभिजीत सावंत चाहत्यांसाठी गोड सरप्राईज घेऊन आला आहे.
तरुणाईला सुमधुर आवाजनं वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजे, अभिजीत सावंत. फक्त संगीताची जादू नाही, तर त्यानं बिग बॉस सारख्या रियालिटी शोमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. बिग बॉसनंतर अभिजीत काय नवीन काम करणार? कोणतं गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार? याची उत्सुकता सगळ्यांना होती. अशातच आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून अभिजीत चाहत्यांसाठी एक गोड सरप्राईज घेऊन आला आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.
'चाल तुरु तुरु ' या जुन्या गाण्याचं खास नवं व्हर्जन अभिजीत करणार आहे. येत्या 2 मे 2025 रोजी हे खास गाणं रिलीज होणार असून मूळ गाण्याचं काहीतरी हटके ट्वीस्ट असलेलं हे नवं गाणं असल्याची माहिती समोर येत आहे. आजवर अभिजीतनं त्याचा आवाजाची जादू दाखवून अनेकदा गाण्याची पर्वणी प्रेक्षकांना दिली आहे. आता हे नवं गाणं बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत.
View this post on Instagram
2025 वर्ष अभिजीत सावंतसाठी एका कारणानं खास आहे. संगीत विश्वातील अभिजीतचं हे विसावं वर्ष आहे. याच निमित्तानं अभिजीतनं 'चाल तुरु तुरु' गाणं प्रेक्षकांना भेट म्हणून दिलं आहे. प्रेक्षक कायम अभिजीतच्या नवनव्या कलाकृतींची वाट बघत असतात आणि अशातच हे नवं गाणं प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे.
तरुणाईचा लाडका गायक असलेला अभिजीत कायम वेगवेगळ्या गाण्याची पर्वणी त्याचा चाहत्यांना देत आला आहे. त्यामुळे अभिजीतचं नवं गाणं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, अभिजीतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, फर्स्ट इंडियन आयडॉलचा किताब जिंकणारा अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. तो 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा फर्स्ट रनरअप ठरला. बिग बॉसच्या घरात अभिजीतनं संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. त्यानंतर अभिजीतनं सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























