India's Richest Youtuber: ना भुवन बाम, ना कॅरी मिनाटी, 'हा' भारतातील सर्वात श्रीमंत यूट्यूबर; नेटवर्थमध्ये बॉलिवूड स्टार शाहीद, रणवीरलाही देतो मात
India's Richest Youtuber: देशातील असा एक YouTuber, ज्याच्या YouTube चॅनेलवर 23.7 मिलियनहून अधिक सब्स्क्राइबर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती काहीशे कोटींमध्ये आहे आणि तो संपत्तीच्या बाबतीत अनेक बॉलिवूड स्टार्सशी स्पर्धा करतो.

India's Richest Youtuber: सध्याचं युग डिजिटलचं असल्याचं सर्रास सारेजण बोलतात. अशातच, डिजिटल इंडियाच्या (Digital India) युगात, YouTube अनेकांसाठी रोजगाराचं माध्यम बनलं आहे. सुशिक्षित लोकांपासून ते अगदी अशिक्षितांपर्यंत, लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण युट्यूबवरुन बक्कळ कमाई करतात. सध्याच्या युट्यूबर्सचं जर नेटवर्थ काढलं तर, अनेकांची कमाई बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही सहज जास्त येईल. अशातच भारतात अनेक युट्यूबर्स (Youtuber) आहेत, ज्यांची फॅनफॉलोइंगही तेवढीच जास्त आहे. पण, तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत YouTuber बद्दल (Richest YouTuber In India) माहिती आहे का?
देशातील सर्वात श्रीमंत युट्यूबर्सचा (Richest YouTuber) विषय आला की, आपल्या डोळ्यांसमोर भुवन बाम (Bhuvan Bam), कॅरी मिनाटी (Carry Minati), फ्लाईंग बिस्ट (Flying Beast), मुंबईकर निखिल (Mumbaikar Nikhil) यांसारख्या अनेक युट्यूबर्सची नावं येतात. पण, कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर यांच्यापैकी कुणीच नाही. हा तो युट्यूबर आहे, जो संपत्तीच्या बाबतीत अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सना मागे टाकतो. याचं नेटवर्थ ऐकलं तर तुम्हाला नक्कीच चक्कर येईल. आम्ही ज्या युट्यूबरबाबत बोलत आहोत, त्याचं नाव गौरव चौधरी आहे. थोडा गोंधळ उडाला असेल, गौरव चौधरी म्हणजे, 'टेक्निकल गुरुजी'.
View this post on Instagram
10 वर्षांपासून चालवतोय 'युट्यूब चॅनल'
गौरव चौधरी 'टेक्निकल गुरुजी' या नावानं त्याचं यूट्यूब चॅनल चालवतोय. तो 2015 पासून हे चॅनेल चालवतोय आणि सध्या त्याचे 23.7 मिलियनहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. या यूट्यूब चॅनेलवर, गौरव लोकांना मोबाईल आणि लॅपटॉपबद्दल सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देतो. एकंदरीतच टेक्नॉलॉजीच्या सर्व उपकरणांबाबत गौरव सबस्क्राइबर्सना माहिती देतो. टेक्निकल गुरुजीनं दिलेल्या माहितीवर लोकं डोळे झाकून विश्वास ठेवतात. गौरवनं त्याच्या चॅनलवर व्हिडीओ अपलोड करताच, क्षणार्धात तो व्हायरल होतो आणि लाखो व्ह्यूज मिळतात.
टेक्निकल गुरुजीच्या नेटवर्थसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी पानी कम चाय
गौरव चौधरीनं युट्यूबवर त्याच्या 10 वर्षांच्या प्रवासात खूप पैसे कमावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 356 कोटी रुपये आहे आणि या एकूण संपत्तीसह, तो भारतातील सर्वात श्रीमंत YouTuber आहे. संपत्तीच्या बाबतीत, गौरव चौधरीनं केवळ भुवन बाम आणि कॅरी मिनाटी सारख्या प्रसिद्ध युट्यूबर्सनाच मागे टाकले नाही, तर अनेक बॉलिवूड स्टार्सनाही मागे टाकलं आहे. या यादीत शाहिद कपूर (नेटवर्थ 300 कोटी) आणि रणवीर सिंह (नेटवर्थ 245 कोटी) यांची नावं आहेत.
भारतातील टॉप 5 श्रीमंत यूट्यूबर्सचं नेटवर्थ
- गौरव चौधरी : 356 कोटी
- भुवन बाम : 122 कोटी
- अमित भडाना : 80 कोटी
- अजेय नागर(कॅरी मिनाटी) : 50 कोटी
- निशा मधुलिका : 43 कोटी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























