एक्स्प्लोर

'बिग बॉसच्या घरात लाडका भाऊ योजना..' भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? राकेश अन् दिव्याला झापलं कारण...

Riteish Deshmukh Slams Rakesh Bapat and Divya Shinde: बिग बॉस मराठी 6 चा भाऊचा धक्का प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आठवड्यात नेमकं कोण घरातून बाहेर पडणार? याकडे सर्वांच्यात नजरा आहेत.

Riteish Deshmukh Slams Rakesh Bapat and Divya Shinde: बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.  या सिझनमधील स्पर्धकांमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत येत आहे.  भाऊचा धक्का या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे.  भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख प्रचंड नाराज असल्याचं दिसून आलं.  कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत संतापात दिसत आहे. यावेळी त्याने  राकेश बापट आणि दिव्या शिंदेला स्पष्ट शब्दांत झापलं. यावेळी त्याने 'घरात लाडका भाऊ योजना सुरू आहे', असं म्हटलं आहे. त्यानं केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  या एपिसोडचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कलर्स मराठीने शेअर केलेला प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत संतप्त दिसत आहे. राकेशवरून रितेश देशमुखने दिव्याची शाळा घेतली असल्याचं पाहायलं मिळालं. यावेळी रितेशने  दोघांना स्पष्ट शब्दांत सुनावलं.  "इथे सतत राकेश दादा, राकेश दादा ते.. एवढंच दिसत आहे. तुमचा काही गेम दिसतच नाही", असं रितेश म्हणतात. यावेळी राकेश आणि दिव्या दोघेही शांत बसतात.   यावेळी रितेश देशमुख दिव्या  शिंदेला 'तुम्ही बाहेर लीडर आहात ना?', असा प्रश्न विचारतात. तेव्हा दिव्या शिंदे रितेश देशमुखला 'हो सर' असे उत्तर देते.  तेव्हा रितेश, 'बाहेर लीडर असलात तरी,  तुम्ही केवळ सपोर्टर म्हणूनच दिसत आहात.. म्हणजेच राकेश यांच्या प्रवक्ताच बनल्यासारखं वाटतंय', असं दिव्याला म्हणतात.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रितेश देशमुख राकेश आणि दिव्या यांची  शाळा घेत असताना दोघेही मान खाली घालून बसतात. रितेश दिव्याला सुनवत असताना, रूचिता खुश होते.  तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. दरम्यान, या प्रोमो रिलीज होताच काही जण दिव्याला सपोर्ट करत आहेत. दिव्यानं स्वतंत्र खेळावं, असं काही नेटकरी म्हणत आहेत. तर, काहींनी अनुश्रीला घरातून काढण्याची मागणी केली आहे. या आठवड्यात नेमकं घरातून आऊट होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'हे एक षडयंत्र..बरोबर ना?' अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget