एक्स्प्लोर

सैन्य दलावर सिनेमा करताय? थांबा!

बऱ्याचदा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नको त्या गोष्टी त्यात घुसडल्या जातात. यातून सैन्य दलाचा आब दुखावला जातोच पण जनसामान्यांच्या भावनाही दुखावल्या जातात. वाद वाढतात. म्हणून संरक्षण मंत्रालयाने आता याबद्दल नवा नियम बनवला आहे.

मुंबई : आपल्याला भारतीय सैन्य दलाबद्दल कमालीचं आकर्षण असतं. त्यांचा युनिफॉर्म.. त्यांची शिस्त.. त्यांची देशभक्ती.. त्यांची कमिटमेंट या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. कारण सैन्यात दाखल होणं हे सोपं काम नाही. पायदळ, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांमध्ये दाखल होण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, कित्येकदा प्राणांची बाजी लावावी लागते. म्हणूनच प्रत्येक देशवासीयाला आपल्या सैन्याबद्दल कमालीचा आदर असतो. हा आदर लक्षात घेऊनच अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना सैन्यदलावर बेतलेले किंवा त्या भवती फिरणारे. किंवा सैन्य दलाची पार्श्वभूमी असणारे सिनेमे बनवावे वाटतात. यापूर्वी अनेक सिनेमे आले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायचा तर हकिकत, बॉर्डर, लक्ष्य, जमीन, उरी, अय्यारी, बेबी अशा सिनेमांचा करता येईल. आता वेबसिरीजच्या जमान्यात हा मोह आणखी वाढतो. बऱ्याचदा या मोहापायी किंवा बऱ्याचदा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नको त्या गोष्टी त्यात घुसडल्या जातात. यातून सैन्य दलाचा आब दुखावला जातोच पण जनसामान्यांच्या भावनाही दुखावल्या जातात. वाद वाढतात. म्हणून संरक्षण मंत्रालयाने आता याबद्दल नवा नियम बनवला आहे. प्रेक्षकांची चंगळ, आज चार चित्रपट OTT वर रिलीज होणार यापुढे कुणालाही सिनेमा वा वेबसीरीजमध्ये भारतीय सैन्यदलाशी संबंधित कोणतीही गोष्ट दाखवली असेल तर ती चित्रकृती प्रदर्शित करण्याआधी संरक्षण मंत्रालयाची एनओसी घ्यावी लागणार आहे. कुणी काय बनवायचे वा नाही यावर संरक्षण मंत्रालयाने काहीच भाष्य केलेलं नाही. पण चित्रकृती पूर्ण झाल्यावर मात्र संरक्षण मंत्रालयाला दाखवून त्यांची ना हरकत घ्यावी लागणार आहे. एका दिवसात साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला दिल बेचारा! काही दिवसांपासून वेबसीरीज वा सिनेमातून दाखवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल अनेक नागरिक तक्रार करत आहेत. बऱ्याच माजी सैनिकांच्या असोसिएशन्सही अनेक प्रॉडक्शन हाऊसेस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एफआयआर दाखल केली आहे. यापुढे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News:  बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्सPankaja Munde : पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ, आता किती संपत्ती?Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तरMurlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News:  बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Ranbir Kapoor :  'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
Embed widget