Avatar 2 : एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार, प्रत्येकात दिसणार निळ्या विश्वाची जादू!
आता या चित्रपटाचे लवकरच चार सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Avatar 2 : नुकताच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar 2) या अवतार चित्रपटाच्या सीरिजमधील दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अवतार या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचे लवकरच चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पाहूयात या सिक्वेल्सची नावं...
अवतार-2 म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर 20 डिसेंबर 2024 रोजी अवतार-3 रिलीज होणार आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे. Culture Crave या ट्विटर अकाऊंटवरुन या सिक्वेल्सची माहिती देण्यात आली आहे.
4 #Avatar sequels are coming 🎥
— Culture Crave 🍿 (@CultureCrave) April 28, 2022
Each sequel will play out as a standalone movie. Each story will come to its own conclusion pic.twitter.com/3bISTqvias
‘अवतार’ या चित्रपटाचा पहिला पार्ट 2009मध्ये प्रदर्शित झाला होता. आता दुसऱ्या आणि पुढील प्रत्येक पार्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
- KGF Chapter 2 BO Collection : ‘केजीएफ 2’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट! चौथ्या आठवड्यातही कोटींची कमाई!
- Panchayat Season 2 Trailer : 'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Emma Chamberlain : ‘मेट गाला’त एम्मा चेम्बरलेनने परिधान केला पटियालाच्या महाराजांचा हार, फोटो पाहताच नेटकरी संतापले!