Athiya Shetty : के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...'
अथिया (Athiya Shetty) आणि के. एल राहुल (KL Rahul) हे तीन महिन्यानंतर लग्नगाठ बांधणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चेवर आता अथियानं रिअॅक्शन दिली आहे.
![Athiya Shetty : के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...' athiya shetty reacted on her wedding with kl rahul Athiya Shetty : के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/13/5cd5050ccc868ae70d80a62d1f5b04ac1657705905_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Athiya Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही क्रिकेटपटू केएल राहुलसोबत (KL Rahul) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. अथिया आणि के. एल राहुल हे सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. अथिया आणि के. एल राहुल हे तीन महिन्यानंतर लग्नगाठ बांधणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चेवर आता अथियानं रिअॅक्शन दिली आहे. अथियाच्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अथियाची पोस्ट
अथियानं इन्स्टाग्रामवरील स्टोरी सेक्शनमध्ये एक स्टोरी अपलोड केली. या स्टोरीमध्ये अथियानं लिहिलं, 'मला आशा आहे की, तीन महिन्यानंतर होणाऱ्या या लग्न सोहळ्याचे आमंत्रण मला देखील दिले जाईल.'
काय म्हणाला सुनील शेट्टी?
अथिया आणि के. एल. राहुल यांच्या लग्नाबाबत अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीमध्ये सुनीलनं सांगितलं, 'अजून लग्नाचे कोणतीही प्लॅनिंग करण्यात आलेली नाही. अथियानं लग्नाचा अजून विचार केलेला नाही.'
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अथियाला केएल. राहुलसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अथियानं उत्तर दिलं होतं, 'मी अशा प्रश्नांना उत्तर देत नाही. मी अशा प्रश्नांवर हसते. लोकांना जो विचार करायचा आहे तो करू देत.' अथिया आणि राहुल त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. राहुलनं व्हॅलेंटाईन डेनिमित्त अथियासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ,'Happy ❤️ day' अथिया आणि राहुलच्या या फोटोनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं.
अथियाचे चित्रपट
अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)