Uddhav Thackeray : 'उत्कंठावर्धक वळण', 'नाटक सुरू..' उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर मराठी कलाकारांच्या पोस्ट चर्चेत
अभिनेता आस्ताद काळे (Astad Kale), आरोह वेलणकर (Aroh Welankar), केदार शिंदे (Kedar Shinde) या मराठी सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. तसेच अभिनेता आस्ताद काळे (Astad Kale), आरोह वेलणकर (Aroh Welankar), केदार शिंदे (Kedar Shinde) या मराठी सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
आस्ताद काळेची पोस्ट
अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या विषयांवरील मतं आस्ताद सोशल मीडियावर मांडतो. आस्तादनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण.'आस्तादच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'बरोबर, राजकारणमध्ये हार-जीत होतेच मान्य आहे,पण ठाकरे यांच्यासोबत जे काही झाले ते वाईटच , आपला माणूस हरल्याची जाणीव झाली.'
आरोह वेलणकरची पोस्ट
आरोहनं ट्वीट केल, 'महाराष्ट्रातील लोकांचा विजय झाला'दुसऱ्या ट्वीटमध्ये आरोहनं लिहिलं, 'Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…'
Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…🇮🇳 pic.twitter.com/qsDUdCNtOn
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
केदार शिंदे
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर 'तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!', अशी पोस्ट केली आहे.
‘शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
हेही वाचा:
- Prakash Raj, Uddhav Thackeray : ‘महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील..’, अभिनेता प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट!
- Hemant Dhome : 'मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना…'; अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत