A. R. Rahman : दक्षिण आणि उत्तर भारताबाबत ए. आर. रहमान यांचे वक्तव्य; म्हणाले, 'आता एक होणे आवश्यक'
A. R. Rahman : नुकतीच ए. आर. रहमान(A. R. Rahman) यांनी CII-दक्षिण भारत मीडिया आणि मनोरंजन शिखर संमेलनामध्ये हजेरी लवाली होती.

A. R. Rahman : ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान(A. R. Rahman) यांनी नुकतीच CII-दक्षिण भारत मीडिया आणि मनोरंजन शिखर संमेलनामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ए. आर. रहमान यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं की, 'आता सर्वांनी एक होण्याची आणि मतभेद मिटवण्याची वेळ आली आहे.' पुढे ते म्हणाले की, 'कलेच्या माध्यमामधून माध्यमातून लोकांमध्ये विभागणी करणे खूप सोपे आहे.
मलेशियामध्ये घडलेल्या घटनेबाबत देखील ए. आर. रहमान यांनी सांगितले. ते म्हणाले, 'मी जवळपास सात वर्षाआधी मलेशियाला गेलो होतो. एका चिनी व्यक्तीला भेटलो. त्यांनी मला प्रश्न विचारला. तुम्ही भारतीय आहात ना? पुढे तो व्यक्ती म्हणाला, मला भारत देश खूप आवडतो. मला उत्तर भारत जास्त आवडतो. तेथील लोक अधिक निष्पक्ष आहेत. त्यांचे चित्रपट जास्त आकर्षक असतात.' याबद्दल ए. आर. रहमान यांनी पुढे सांगितलं, 'या व्यक्तीच्या या मतानं मला विचार करायला लावलं. यामुळे मला प्रश्न पडला की, त्या व्यक्तीने दक्षिण भारतीय चित्रपट पाहिले असतील? आणि त्याने असे विधान का केले? '
ए. आर. रहमान यांनी पुढे सांगितले, 'या गोष्टीचा मी विचार केला. मग, मला असे आढळले की आम्हाला लोकांना कलेच्या रंगात रंगवण्याची गरज आहे. दक्षिण भारत असो की उत्तर भारत, भारत हा संपूर्ण आहे.'
एकजूटीबाबत ए. आर. रहमान यांनी सांगितलं, 'कलेच्या माध्यामधून लोकांची विभागणी करणं सोपे आहे. पण आता मतभेद दूर करून एक होण्याची वेळ आली आहे. '
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : ‘तो अनिरुद्धला अन्या म्हणाला अन् अनिरुद्ध फेमस झाला!’, मिलिंद गवळींची ‘या’ अभिनेत्याची खास पोस्ट!
- Runway 34 Trailer : लोकांचा जीव वाचवणारा कॅप्टन विक्रम कसा ठरला दोषी? ‘रनवे 34’मधून अजय देवगण सांगणार थरारक कथा!
- Amit Shah, A. R. Rahman : अमित शाह यांच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यानंतर ए.आर. रहमानचं ट्वीट चर्चेत; म्हणाला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
