Aai Kuthe Kay Karte : ‘तो अनिरुद्धला अन्या म्हणाला अन् अनिरुद्ध फेमस झाला!’, मिलिंद गवळींची ‘या’ अभिनेत्याची खास पोस्ट!
Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ही खास पोस्ट अभिनेते मयूर खांडगेसाठी (Mayur Khandge) आहे.
Milind Gawali : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali ) हे ‘अनिरूद्ध’ ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते शेअर करतात. मिलिंद गवळी नुकतीच एका अभिनेत्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.
मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ही खास पोस्ट अभिनेते मयूर खांडगेसाठी (Mayur Khandge) आहे. मयूर खांडगे हे या मालिकेत संजनाचा माजी पती ‘शेखर’ सकारात आहेत. ऑनस्क्रीन कितीही वैर असले, तरी ऑफस्क्रीन हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेच्या प्रसिद्धीचं श्रेय मयूर यांना दिलं आहे.
पाहा पोस्ट :
‘मयूर खांडगे, ज्याच्या येण्याने चैतन्य येतं सेटवर! तो आला की वातावरणच बदलतं. त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की, सीन विषयी चर्चा असते. सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं. बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखरचे..तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार खूप बोलणार..बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गंमतीशीर मजा आणणारी लिहिते आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो. पण, त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते. आई कुठे काय करते या सिरीयलमध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे, ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेक वेळा बदली आहेत. बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत, ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्धसाठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला, तो म्हणजे अन्या देशमुख, अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला.’
शेखरची मालिकेत पुन्हा एण्ट्री!
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत बऱ्याच दिवसांनी शेखरची एण्ट्री झाली आहे. संजना आणि अनिरुद्धचं लग्न झाल्यापासून मालिकेत संजनाचा माझी पती अर्थात शेखर दिसलाच नव्हता. आता त्याचं मालिकेत पुरागमन झालं आहे. शेखरच्या परत येण्याने मालिकेत आता एक नवी धमाल पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याला पाहून आता संजना आणि अनिरुद्धची पाचावर धारण होणार आहे. इतके दिवस सगळ्यांपासून लांब असलेला शेखर आता देशमुखांच्या घरात परतला आहे. त्याच्या येण्याने पुन्हा एकदा संजना आणि अनिरुद्धच्या आयुष्यात गोंधळ उडणार आहे. मात्र, शेखरच्या येण्याने अरुंधतीला एक नवी साथ मिळणार आहे.
हेही वाचा :
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...
- Samrenu : ‘सम्या’ ‘रेणू’नंतर ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला, 'समरेणू'च्या पोस्टरचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अनावरण!
- Runway 34 Trailer : लोकांचा जीव वाचवणारा कॅप्टन विक्रम कसा ठरला दोषी? ‘रनवे 34’मधून अजय देवगण सांगणार थरारक कथा!