Amit Shah, A. R. Rahman : अमित शाह यांच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यानंतर ए.आर. रहमानचं ट्वीट चर्चेत; म्हणाला...
अमित शाह (Amit Shah) यांच्या वक्तव्यानंतर संगीतकार ए. आर. रहमान(A. R. Rahman) च्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Amit Shah, A. R. Rahman : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेचा वापर देशात करण्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांशी इंग्रजीत नव्हे तर हिंदीत संवाद साधावा.' आता त्यांच्या या वक्तव्यानंतर संगीतकार ए. आर. रहमान(A. R. Rahman) च्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर रहमान ने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी तमिळ कवी भारतीदासन यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत. ज्यामध्ये सांगितलं आहे की, तामिळ हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. या पोस्टवर तमिझानंगु म्हणजेच देवी तमिळ असं लिहिले आहे आणि Goddess Tamilचा फोटो देखील ए. आर. रहमाननं शेअर केला आहे. ए. आर. रहमानच्या या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अमित शाह यांच्या वक्तव्याला ए. आर. रहमाननं उत्तर दिलं आहे, अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
— A.R.Rahman (@arrahman) April 8, 2022
ए.आर रहमाननं शेअर केलेल्या या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केले आहे. तर काहींनी लाइक्स आणि कमेंट्स देखील केल्या आहेत. ए.आर रहमाननं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये हजेरी लावली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Amit Shah : विविध राज्यातील लोकांनी इंग्रजीत नव्हे तर हिंदी भाषेतच बोलावे, अमित शहांचा हिंदीच्या वापरावर भर
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
- IT कंपनीच्या CEO ने पाच कर्मचाऱ्यांना दिली कोटींची BMW कार भेट, जाणून घ्या काय आहे कारण
- Shehnaaz Gill : शेहनाजनं दिली सुवर्ण मंदिराला भेट; शेअर केले खास फोटो