OTT Web Series And Films : अपहरण-2 ते जलसा; या आठवड्यात ओटीटीवर हे धमाकेदार चित्रपट अन् सीरिज होणार रिलीज
OTT Web Series And Films : पाहूयात या आठवड्यात कोण कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
OTT Web Series And Films : सध्या ओटीटी अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. पाहूयात या आठवड्यात कोण कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
जलसा (Jalsa)
चित्रपटाचे कथानक हे या दोन भूमिकांवर आधारित असणार आहे. त्यामधील पत्रकाराची भूमिका ही अभिनेत्री विद्या बालननं साकारली आहे. तर चित्रपटात विद्या बालनसोबतच शेफाली शाह रोहिणी हट्टंगडी, इकबाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत यादव, शफीन पटेल आणि सूर्या कसीभटला हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.जलसा हा चित्रपट 18 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.
इटर्नली कंफ्यूज्ड अँड ईगर टू लव (Eternally Confused and Eager For Love)
या सीरिजचे कथानक 20 वर्षाच्या एका मुलाच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे. या सीरिजची निर्मीती जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या 'टाइगर बेबी फिल्म्स' नं केली आहे. तसेच फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचे 'एक्सेल एंटरटेनमेंट' हे देखील या सीरिजचे सहनिर्माते आहेत. सीरिजमध्ये विहान समत, राहुल बोस, सुचित्रा पिल्लई, जिम सर्भ आणि अंकुर राठी हे या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. इटर्नली कंफ्यूज्ड एंड ईगर टू लव ही सीरिज 18 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
अपहरण-2 (Apharan 2)
एकता कपूर आणि जियो स्टडिओज यांच्या अपहरण-2 या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. 18 मार्च रोजी ही सीरिज वूड या अॅपवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये अरुणोदय सिंह, निधि सिंह, स्नेहिल दीक्षित मेहरा आणि सानंद वर्मा हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
मिसेज अँड मिस्टर शमीम (Mrs. & Mr. Shameem)
"मिसेज अँड मिस्टर शमीम" ही सीरिज आज (17 मार्च) झी-5 वर प्रदर्शित होणार आहे. शमीम आणि उमैना या दोघांच्या आयुष्यावर या सीरिजचं कथानक आधारित आहे.
महत्वाच्या बातम्या
- RRR song teaser : राम चरण अन् ज्यूनियर एनटीआरसोबत थिरकली आलिया; 'आरआरआर' मधील धमाकेदार गाण्याचा टीझर रिलीज
- Alia Bhatt and Ranbir Kapoor : अखेर मुहूर्त ठरला! आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे, 'ब्रह्मास्त्र' रिलीज होताच लग्न
- Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीर की आलिया; कोणाकडे संपत्ती जास्त? जाणून घ्या त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबाबत..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha