Anushka Sharma : आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला, विराटच्या जिगरबाज खेळीनंतर अनुष्काची पोस्ट
Anushka Sharma : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहीली आहे.
Anushka Sharma : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात आज (23 ऑक्टोबर) रोजी सर्वात मोठा सामना झाला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत भारतीयांना दिवाळीची अप्रतिम भेट दिली आहे. भारताच्या या विजयाने संपूर्ण देश जल्लोष करत आहे. या विजयाचा हिरो विराट कोहलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयामुळे विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही खूप आनंदी आहे. तिने आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
अनुष्काने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली टीव्हीवर दिसत आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक हृदयस्पर्शी नोटही लिहिली आहे. अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'दिवाळीपूर्वी तू आज लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहेस. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती आहेस. तुझा खेळ, इच्छाशक्ती सर्वकाही आश्चर्यकारक आहे. मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात 160 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने या सामन्यात संघाला पुनरागमन केले. सामना संपेपर्यंत कोहली क्रीजवर होता. त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
T20 World Cup 2022 : विजयानंतर विराट कोहली भावूक, म्हणाला....