T20 World Cup 2022 : विजयानंतर विराट कोहली भावूक, म्हणाला....
Virat Kohli : पाकिस्तानची गोलंदाजी अचूक टप्प्यावर पडत होती. पण आम्ही ठरवलं होतं, शेवटपर्यंत लढायचं, असेही कोहली म्हणाला.
Virat Kohli Reaction : विराट कोहलीची जिगरबाज फलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि हर्शदीपचा भेदक मारा, या जोरावर भारतानं पाकिस्तानचा चार गड्यांनी पराभूत केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. विराट कोहलीनं 82 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं गोलंदाजीमध्ये तीन विकेट आणि फलंदाजी करताना मोक्याच्या क्षणी 40 धावांची खेळी केली. तर युवा अर्शदीप याने तीन विकेट घेत मोलाची कामगिरी बजावली. केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला होता. त्यानंतर एकाबाजूला विकेट जात असताना विराट कोहलीनं संयमी फलंदाजी केली. कर्णधार रोहित आणि सूर्यकुमार यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अक्षर पटेलही स्वस्तात माघारी परतला होता. पण त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी सामना फिरवला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला.. पण विराट कोहलीनं जिगरबाज खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. विजयानंतर विराट कोहली भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर विराट कोहलीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सामनावीर पुरस्कार घेतल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, टी 20 क्रिकेटमधील आतापर्यंतची माझी ही सर्वोत्तम खेळी आहे. या खेळीबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ही खेळी मी कशी केली हे सांगू शकत नाही. हार्दिक पांड्यानं मला मैदानावर विश्वास दिला. स्वत:वर विश्वास ठेव... आपण अखेरपर्यंत खेळू सामना जिंकू शकतो, असा विश्वास हार्दिकनं दिला. त्यामुळेच माझाही आत्मविश्वास वाढला. शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करायला आल्यानंतर आम्ही त्याला टार्गेट करायचं ठरवलं होतं. अखेरच्या तीन चार षटकामध्ये धावाचं गणित आमच्या डोक्यात होतं. कारण, नवाजची एक ओव्हर टाकणार, यात शंकाच नव्हती. सर्व वेगवान गोलंदाजांच्या कोटा संपला होता. अखेरच्या 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर थोडासा दबाव वाढला होता.. पण इथपर्यंत आल्यानंतर आता शेवट करायचा हेच डोक्यात होतं. अखेर सामना जिंकला... ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळीपैकी एक होती. पाकिस्तानची गोलंदाजी अचूक टप्प्यावर पडत होती. पण आम्ही ठरवलं होतं, शेवटपर्यंत लढायचं, असेही कोहली म्हणाला. रौफला धुतला की पाकिस्तान सैरभैर होणार माहीत होतं, आम्ही नेमकं तेच केलं, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली.
He was crying, the emotions this man created, never seen a better player than him. #ViratKohli𓃵 thanks for everything G.O.A.T Virat Kohli #INDvsPAK2022 pic.twitter.com/ov3dkqrtja
— Nimit Narayani (@nimit2611) October 23, 2022
अखेरच्या षटकात नेमकं काय झालं?
6 चेंडू 16धावांची गरज
पहिला चेंडू पंड्याची विकेट
5 चेंडू 16धावा
दुसरा चेंडू कार्तिकची 1 धाव
4 चेंडू 15 धावा
तिसरा चेंडू कोहलीच्या 2 धावा
3 चेंडू 13धावा
चौथा चेंडू कोहलीचा नो बॉलला षटकार (7 धावा जमा)
3 चेंडू 6 धावा
चौथा चेंडू मोहम्मद नवाजचा वाईड बॉल
3 चेंडू 5 धावा
चौथा चेंडू बाईजच्या तीन धावा जमा
2 चेंडू 2 धावा कार्तिकची विकेट
1 चेंडू 2 धावा, नवाजचा वाईड बॉल
1 चेंडू 1 धाव अश्विनचा विजयी फटका