(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi actress : बिग बींसोबत झळकली मराठी अभिनेत्री, केबीसीच्या निमित्ताने मिळाली संधी, म्हणाली, पहिली गोष्ट...
Marathi actress : अभिनेत्री अनघा अतुल हिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली असून तिच्या सोशल मीडियावरुन तिने ही माहिती दिली.
Marathi actress : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे पुन्हा एकदा केबीसीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचनिमित्ताने सध्या या कार्यक्रमांच्या जाहिराती प्रसारित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे याच निमित्ताने एका मराठी अभिनेत्री अमिताभ यांच्यसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनेत्री अनघा अतुल (Anangha Atul) ही कोन बनेगा करोडपतीच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली.
अभिनेत्री अनघा अतुल ही रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरांत पोहचली. तसेच अनघा ही भगरे गुरुजींची लेक आहे. तिने तिचं नवं रेस्टॉरंट देखील पुण्यात सुरु केलंय. त्यातच आता ती बिग बींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अनघाच्या या कामाचं सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी देखील कौतुक केलं आहे.
अनघाची पोस्ट काय?
अनघाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट तिच्या जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर तिने कॅप्शन देत म्हटलं की, नवीन काम, कोणतीही पहिली गोष्ट ही कायमच स्पेशल असते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. सध्या अनघाच्या या कामाचं सोशल मीडियावरही बरंच कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतंय.
काही महिन्यांपूर्वीच अनघाने स्वत:चं हॉटेल सुरु केलं होतं. त्यामुळे अनघा बरीच चर्चेत होती. त्यातच ती कलर्स मराठी वाहिनीवरील पिरतीच वणवा उरी पेटला या मालिकेतही झळकली होती. त्यानंतर आता तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
अनघाच्या कामाचं कलाकार मंडळींनी केलं कौतुक
अनघाच्या कामाचं कलाकार मंडळींकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके, तितिक्षा तावडे, शिवानी सोनार, ऋतुजा बागवे, पूजा बिरार, रेश्मा शिंदे या कलाकार मंडळींनी कमेंट करत अनघाचं कौतुक केलं आहे. अनघासाठी हा तिचा पहिला अनुभव हा अत्यंत स्पेशल असल्याचंही तिच्या पोस्टवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :