एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : समंथाचं घटस्फोटावर मोठं वक्तव्य, म्हणाली ‘मला आणि नागा चैतन्यला एकाच घरात ठेवलं तर...’

Samantha Ruth Prabhu : कारण जोहरच्या शोमध्ये समंथाने माजी पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि तिच्या घटस्फोटाबद्दलही उघडपणे वक्तव्ये केली.

Samantha Ruth Prabhu : बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता कारण जोहर (Karan Johar) याचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’चा सातवा सिझन (Koffe With Karan 7) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत या शोमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), रणवीर सिंह (Ranveer singh), जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या नव्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या.

यादरम्यान समंथाने माजी पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि तिच्या घटस्फोटाबद्दलही उघडपणे वक्तव्ये केली. यासोबतच तिने याचीही कबुली दिली की, अजूनही त्यांच्यातील वैर तसेच आहे. घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झालेले नाही. दोघांमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही. समंथा म्हणाली, ‘आम्हाला जर एकाच घरात ठेवलं तर तिथल्या सगळ्या धारदार वस्तू लपवून ठेवाव्या लागतील. अन्यथा आम्ही एकमेकांचा जीव घेऊ शकतो.’ यावरून लक्षात येते की, दोघांमध्ये टोकाचे वैर निर्माण झाले आहे.

करण चुकून पती म्हणाला अन्...

‘कॉफी विथ करण 7’च्या मंचावर करणने समंथाला बोलतं केलं. करण समंथाला म्हणाली की, मला वाटतं तुम्हा दोघांमध्ये घटस्फोटाचा निर्णय पहिला तू घेतला होतास. यावेळी करण चुकून नागा चैतन्यला समंथाचा पती म्हणाला. यावर करणला रोखत समंथाने लगेच ‘पूर्व पती’ म्हणायला लावले. करणला देखील स्वतःची चूक लगेच दुरुस्त करायला लागली.

मी आता यातून बाहेर पडले आहे...

करणने समंथाला विचारले की, घटस्फोटाचा निर्णय घेताना आणि नंतर तो जाहीर करताना ट्रोलिंगची भीती वाटली का? यावर उत्तर देताना समंथा म्हणाली की, 'मला ट्रोल केले तरी मी त्याबद्दल तक्रार करू शकत नाही. तो मार्ग मी स्वतः निवडला आहे. मी माझ्या चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने राहण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही दोघे वेगळे झालो, यापेक्षा जास्त दुःखद काहीच असू शकत नाही. मी एक अभिनेत्री आहे, माझ्या आयुष्यात चाहत्यांचे खूप योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांनी मला माझ्या नात्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. आता मला वाटते की, मी यातून बऱ्यापैकी बाहेर आले आहे. पूर्वीपेक्षा खूप खंबीर झाले आहे.’

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget