एक्स्प्लोर

"तुला माहितीये का तुझा बाप कोण?"; ट्रोलरच्या पोस्टवर संतापले अमिताभ बच्चन

रुग्णालयातून ब्लॉग लिहिताना त्यांनी आपल्या तब्येतीबद्दलही माहिती दिली होती. त्या दोन दिवस जुन्या ब्लॉगवर एक ट्रोलर व्यक्त झाला. या ट्रोलरचा बच्चन यांनी आपल्या अत्यंत डोलदार शेलीत हिंदीतून चांगला समाचार घेतला.

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी तमाम भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गेल्या 50 पेक्षा जास्त वर्षांपासून अमिताभ बच्चन हिंदी इंडस्ट्रीत काम करतायत. त्यांच्या कामाची दखल घेऊनच सामान्य सिनेप्रेमी त्यांच्यावर प्रेम करू लागला. कुलीच्या सेटवर अपघात झाल्यानंतर घराघरांत देव पाण्यात ठेवले गेले ते त्यासाठीच. लोकांना कुलीची आठवण इतक्या वर्षांनी झाली, कारण अमिताभ यांना 11 जुलैला कोरोनाचं निदान झालं. त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली. अर्थात त्यानंतर तातडीने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता ते बरेही होऊ लागले आहेत. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज मिळेल. रुग्णालयात असूनही बच्चन यांनी आपलं ब्लॉग लेखन चालूच ठेवलं आहे. अशाच त्यांच्या नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमधून धक्कादायक बाब समोर आली.

डे 4527 या ब्लॉगमध्ये बच्चन यांनी ऐश्वर्या आणि आराध्या यांना डिस्चार्ज मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेतच. त्याच ब्लॉगमध्ये पुढे या ट्रोलरचा समाचार त्यांनी घेतला आहे. रुग्णालयातून ब्लॉग लिहिताना त्यांनी आपल्या तब्येतीबद्दलही माहिती दिली होती. त्या दोन दिवस जुन्या ब्लॉगवर एक ट्रोलर व्यक्त झाला. अर्थात ते व्यक्त होणं नींदनीय आणि विकृत होतं. या ट्रोलरला नाव नाही. 'मी आशा व्यक्त करतो की तुम्ही या कोव्हिडने मराल!' या ब्लॉगरच्या टिप्पणीवर अमिताभ बच्चन संतापले. त्याचा आपल्या योग्य शब्दात त्यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणतात, ते मला असं सांगतात, की मी आशा करतो की तुम्ही या कोव्हिडने मराल. अरे निनाव्या ट्रोलर. तू साधं तुझ्या वडिलांचं नावही लिहिलेलं नाहीस. कारण, तुला तुझे वडिल कोण आहेत हेच माहीत नाही. आता केवळ दोन गोष्टी होतील. एकतर मी मरेन. नाहीतर मी जिवंत राहीन. जर मी मेलो, तर तुला तुझ्या मनासारखं लिहिता येणार नाही. त्यानंतर तुझ्या लिखाणावर कोणी लक्षही देणार नाही कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हयात नसतील. आणि जर मी जिवंत राहिलो, तर मात्र तुम्हाला 90 मिलीयन लोकांशी सामना करावा लागेल. मी तुला सांगू इच्छितो की ही एक सेना आहे. जी पूर्वेकडून पश्चितमेपर्यंत आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत पसरलेली आहे. एका क्षणात ही सगळी एक कुटुंब बनेल. आता फक्त मी त्यांना हे सांगण्याचा अवकाश आहे, मी त्यांना सांगेन.. ठोक दो साले को. हे लिहितानाच बच्चन यांनी आपल्या अत्यंत डोलदार शेलीत हिंदीतून त्याला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणतात, 'मारीच, अहिरावन , महिषासुर, असुर , उपनाम हो तुम ; हमारा यज्ञ प्रारम्भ होते ही, तुम राक्षसों की तरह तड़पोगे , जान लो इतना की अब तुम ही केवल समाज की आवाज़ ना हो ; चरित्र हीन, अविश्वासी , श्रद्धा हीन , लीचड़ तुम हो ; जलो गलो पिघलो , बेशर्म , बेहया , निर्लज्ज, समाज कलंकी …' अमिताभ बच्चन यांनी आजवर कधीच अशाप्रकारे भाष्य केलं नव्हतं. आजवर त्यानी ट्रोलर्सना उत्तर देणंही टाळलं होतं. पण निनावी ट्रोलरने यावेळी मात्र त्यांना डिवचलं आहे. अमिताभ यांनी पहिल्यांदाच संतापाने हा या ट्रोलरचा समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेकलाही कोरोनाची लागण झाली. त्यानतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कालांतराने ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्यालाही कोरोनाची लागण झाली होती. पैकी दोघींना आता घरी सोडण्यात आलं आहे. अभिषेक आणि अमिताभ हे मात्र अजून रुग्णालयात उपचार घेत आहेत. संबंधित बातम्या :  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget