अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातील डॉक्टरांसाठी लिहिली कविता
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची नात आराध्या बच्चन अशा चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन या दोघींना घरातच क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, त्यांची तब्येत सुधारत असून आधीपेक्षा स्थिर आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. अभिषेक बच्चन यांच्याही तब्येतीत सुधारणा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. परंतु, अमिताभ बच्चन यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्री पाहता त्यांना आणखी काही दिवसांसाठी रुग्णालयातच राहावं लागणार आहे.
पाहा व्हिडीओ : अमिताभ बच्चन यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद, नानावटी रुग्णालयाची माहिती
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत बिगबी
कोरोनाची बाधा झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तरीही, बिगबी रुग्णालयातून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची माहिती ते आपल्या चाहत्यांना देत असतात. अभिषेक बच्चनही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
अमिताभ बच्चन यांनी काही तासांपूर्वी डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्रोत्साहन करणारी कविता लिहली आहे. त्यांनी या कवितेमार्फत डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना ईश्वराची उपमा दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कवितेतून त्यांची सेवा आणि कर्तव्याबद्दल सांगितलं आहे. हे सर्व लोक स्वतःची चिंतान करता इतरांची सेवा करत आहेत. एवढचं नाहीतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या कवितेतून हेदेखील सांगितलं आहे की, हे सर्व आरोग्य कर्मचारी ईश्वराचं रूप आहेत.
अमिताभ बच्चन यांची मूळ पोस्ट :
अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका परीचा फोटो शेअर केला आहे. तिला ते आरोग्य कर्मचारी मानत आहेत. रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कमीतकमी सात दिवसांसाठी रुग्णालयात राहावं लागणार आहे.' बच्चन पिता-पुत्रां व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघींनाही घरातच क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन नेगेटिव्ह आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रतिमा सुधारण्यासाठी नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ बच्चन यांची मदत? व्हायरल पोस्टवरुन प्रश्न उपस्थित
बिग बी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनची प्रकृती स्थिर, काळजीचं कारण नाहीऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
बिग बी यांच्या उत्तम प्रकृतीसाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना, शोएब अख्तरचं ट्वीट