Akshay Kumar : 'इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पृथ्वीराज यांचा एकही धडा नाही'; अक्षयच्या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अक्षयला (Akshay Kumar) ट्रोल केलं आहे.

Akshay Kumar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. सध्या अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हा पृथ्वीराज चित्रपटाबाबतच्या इतिहासाबद्दल सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अक्षयला ट्रोल केलं आहे.
व्हिडीओमध्ये अक्षय हा एका मुलाखतीमध्ये सांगिताना दिसतो, 'शाळांमध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत एकही धडा नाहीये. दोन किंवा तीन पुस्तकांमध्ये एखादा पॅरेग्राफ तुम्हाला दिसेल. इतिहासामध्ये मुघलांबाबतचा उल्लेख जास्त केला जातो. त्याच पुस्तकांमध्ये पृथ्वीराज यांच्याबाबत फक्त एक ते दोन परिच्छेद माहिती असते. पण मुघलांचे वर्णन हे शंभर परिच्छेदांमध्ये केले जाते. '
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
पृथ्वीराज आणि मुघल यांच्याबाबत अक्षयनं केलेल्या या वक्तव्यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अक्षयला ट्रोल केलं आहे. एका युझरनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'सातवीच्या इतिहासाच्या एनसीआरटी या पुस्तकामध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दोन धडे आहेत. कॅनडा कुमार यांना प्रमोशनमधून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी हे वाचायला पाहिजे.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'मुघल हे 156 ADमध्ये आले होते. तर पृथ्वीराज चौहान हे 1192 AD या युगातील होते. '
#WATCH | Nobody is there to write about it in our history books. I would like to appeal to the Education Minister to look into this matter and see if we can balance it. We should know about Mughals but know about our kings also, they were great too: Actor Akshay Kumar to ANI pic.twitter.com/05WKtQ4dNw
— ANI (@ANI) June 1, 2022
चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय आणि मानुषीशिवाय या चित्रपटात सोनू सूद (Sonu Sood), संजय दत्त (Sanjay Dutt), आशुतोष राणा (Ashutosh Rana), मानव विज (Manav Vij), साक्षी तन्वर (Sakshi Tanwar), ललित तिवारी (Lalit Tiwari) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.
#WATCH | Nobody is there to write about it in our history books. I would like to appeal to the Education Minister to look into this matter and see if we can balance it. We should know about Mughals but know about our kings also, they were great too: Actor Akshay Kumar to ANI pic.twitter.com/05WKtQ4dNw
— ANI (@ANI) June 1, 2022
हेही वाचा :
- Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत नवा ट्विस्ट; कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Hemangi Kavi : 90s मधल्या लोकांना कळेल... आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक गेला; केकेच्या मृत्यूनंतर हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
