Akshay Kumar : 'राजकारणात प्रवेश करणार का?'; अक्षय कुमारच्या उत्तरानं वेधलं लक्ष
अक्षय हा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये अक्षयला विचारण्यात आला. या प्रश्नाला अक्षयनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
Akshay Kumar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरबाबत चाहत्यांना माहिती देत असतो. अक्षयनं नुकतीच लंडनच्या (London) पल मॉलमधील इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रकाश सोहळ्याला हजेरी लावली. या प्रकाशन सोहळ्यामध्ये अक्षयला राजकारणाबाबत विचारण्यात आलं. अक्षय हा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाला अक्षयनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
'राजकारणात प्रवेश करणार का? ', असा प्रश्न विचारल्यावर अक्षयनं उत्तर दिलं की,'मी चित्रपटांमध्ये काम करुनच खुश आहे. एक अभिनेता म्हणून मी सामाजातील लोकांसमोर काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. मी 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे, माझ्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे रक्षाबंधन. मी कधी कधी सामाजिक विषय असलेले व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती देखील करतो. मी वर्षातून तीन-चार चित्रपटांची निर्मिती करतो.' अक्षयच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
अक्षयचा लवकरच रक्षाबंधन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2019 मध्ये दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये राजकारणाबाबत अक्षयनं त्याचं मत व्यक्त केलं. अक्षयनं सांगितलं होतं, 'मला राजकारणात यायाचं नाहीये. मला चित्रपट आवडतात. चित्रपटांच्या माध्यमातून मी काही मुद्दे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हेच माझ काम आहे. '
100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अक्षयनं केलं काम
1991 मध्ये रिलीज झालेल्या सौगंध चित्रपटामधून अक्षयनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानं आत्तापर्यंत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 11 ऑगस्टला अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अक्षयचे राम सेतू आणि सेल्फी हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा: