(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patekar : ‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा, त्यातून तेढ निर्माण करू नये!’, ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया
The Kashmir Files : एकीकडे देशभरातून ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे.
The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले देखील पाहायला मिळाले.
एकीकडे देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळाले. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी देखील या वादावर भाष्य केलं आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अॅपच्या लॉंचिंगवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
इथल्या हिंदू-मुस्लिमांनी एकत्रच राहावे!
या कार्यक्रमाच्या वेळी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन समाज माध्यमांत जे गट पडले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. यात जर गट पडत असतील, ते ते चुकीचं आहे. गट पडण्याची गरजच नाही. अजून मी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी सविस्तर मला बोलता येणार नाही. चित्रपट जर पाहिला असता, तर मला बोलता आलं असतं. मात्र, एखाद्या चित्रपटाबद्दल अशी काँट्रोव्हर्सी होणं हे बरं नाही.’
चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा!
‘चित्रपटाविषयी तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाहीये. ही तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. कारण सगळे छान सलोख्याने राहत असताना, त्यांच्यामध्ये बिब्बा घालायची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो चित्रपटासारखाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. यावरून गट निर्माण होणं साहजिक आहे. पण, म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणं हे काही योग्य नाही’, असे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 6 : ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha