#BoycottLaalSinghChaddha ट्रेडिंगमध्ये; आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची नेटकऱ्यांची मागणी
Laal Singh Chadda : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकला जात आहे.
Laal Singh Chaddha on Twitter : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadda) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकला जात आहे. #BoycottLaalSinghChaddha हे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात टॉम हँक्सने मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. 'लाल सिंह चड्ढा'मध्ये आमिरने 'फॉरेस्ट गंप'ची कॉपी केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. तर दुसरीकडे आमिरने भारतीय संस्कृतीच्या विरोधात अनेक विधाने केली आहेत. त्यामुळेच त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.
आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाला नेटकरी चांगलाच विरोध करत आहेत. 'आमिरचा सिनेमा पाहू नका', 'मित्रांनो करीना कपूर स्वतः म्हणते की मी माझे सिनेमे मी पाहत नाही. त्यामुळे त्यांचे सिनेमे पाहायला जाऊ नका'. अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत. अनेकांनी मीम्स शेअर करत आमिरला ट्रोल केलं आहे.
11 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत.
संबंधित बातम्या