एक्स्प्लोर

Kaljayi Savarkar : भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लघुपटाची निर्मिती! 

Kaljayi Savarkar : 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे.

Kaljayi Savarkar : दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते 'कालजयी सावरकर' (Kaljayi Savarkar) या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो, अशी बोलकी प्रतिक्रिया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर बोलताना दिली.

याप्रसंगी लघुपटातील अभिनेते मनोज जोशी, सौरभ गोखले आणि तेजस बर्वे यांच्यासह इतर सहकलाकार आणि तंत्रज्ञ ही उपस्थित होते. लघुपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर प्रश्नोत्तरादरम्यान बोलताना लघुपटाचे दिग्दर्शक गोपी कुकडे म्हणाले की, 'क्रिएटीव्हीटी अर्थात कलात्मकता ही माध्यम बदललं तरी त्याचं मूळ बदलत नाही त्यामुळे गेली 30हून अधिक वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर आता लघुपटाच्या माध्यमात काम करताना फारसे अवघड गेले नाही.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य!

यावेळी निर्माते आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर सुद्धा उपस्थित होते त्यांनीही पत्रकारांना संबोधित करून आपली या लघुपटामागील निर्मितीची संकल्पना मांडली. लवकरच हा लघुपट विविध संस्थांच्या माध्यमातून गावा-गावांत आणि शहरा-शहरांत भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वर्षाचे औचित्य साधून दाखवला जाणार आहे.

कलाकारांची मोठी फौज!

या लघुपटात पारतंत्र्यातील हिंदुस्थानच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी यांनी, तर नवभारताची भूमिका तेजस बर्वे या अभिनेत्याने साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत सौरभ गोखले यांनी विलक्षण लीलया पेलली आहे. यासोबतच प्रमोद पवार(लोकमान्य टिळक), अपर्णा चोथे(यमुना सावरकर), पायल गोगटे(येसू वहिनी), लिना दातार(ताई दातार), शंतनू अंबाडेकर(स्वातंत्र्यवीर सावरकर - वय 17), जयोस्तु मेस्त्री(स्वातंत्र्यवीर सावरकर-वय 11), हृषिकेश भोसले(गणेश (बाबाराव) सावरकर), रुता पिंगळे(मादाम कामा), पवन वैद्य(श्यामजी कृष्ण वर्मा), मोहित वैद्य(इंग्रज गुप्तहेर), विनोद पवार, प्रितेश कोसबे आणि इतर सहकलाकारांनी अभिनय केला आहे.

जेष्ठ दिग्दर्शक गोपी कुकडे यांचं दिग्दर्शन लाभलेल्या या लघुपटाची संकल्पना दिलीप करंबेळकर यांची असून, सृजन-दिग्दर्शक विनोद पवार यांचे, तर संहिता डॉ. समिरा गुजर, अमोघ पोंक्षे यांची आहे. छायाचित्रण दिनेश कंदरकर, पार्श्वसंगीत अमित विलास पाध्ये, संकलन समीर अन्नारकर, किरण चव्हाण, संशोधन सहाय्य अक्षय जोग, कला दिग्दर्शन अजित दांडेकर, वेशभूषा पूर्णिमा ओक, रंगभूषा सुहास गवते, केशभूषा नर्गिस आणि निर्मिती व्यवस्थापन जयेश मिस्त्री यांची आहे.

हेही वाचा :

Kaljayi Savarkar : ‘कालजयी सावरकर' लघुपटात अभिनेता सौरभ गोखले साकारणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकरां’ची भूमिका!

Kaljayi Savarkar  : 'दुर्दम्य लोकमान्य'नंतर आता उत्सुकता 'कालजयी सावरकर'ची!  लघुपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget