एक्स्प्लोर
पोलीस आणि गुंडांच्या राजकारणामुळे मला जेलमध्ये जावं लागलं : प्रदीप शर्मा
मी एन्काऊंटर शब्दाच्या विरोधात आहे. मीडियाने हा शब्द तयार केला. यासाठी पोलीस ऑपरेशन हा शब्द आहे, असेही ते म्हणाले. एन्काऊंटर करणं किंवा माणसांना मारणं मला आजिबात आवडत नव्हतं मात्र काही प्रसंग असतात, ज्यावेळी देशासाठी, लोकांसाठी असं पाऊल उचलावं लागत, असं शर्मा म्हणाले.
मुंबई : आयुष्यात न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगली. त्यामुळे मी तुरुंगातही गेलो. पोलीस आणि गुंडांच्या राजकारणामुळे मला जेलमध्ये जावं लागलं असल्याचा दावा नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केला आहे. माझ्यावर नाहक कारवाई झाली मात्र मला कोर्टातून निर्दोष सोडलं गेलं. मी जेलमध्ये गेल्यानंतर आत मी पकडलेले गुन्हेगार होते, असेही ते यावेळी म्हणाले. प्रदीप शर्मा एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात बोलत होते.
नुकताच त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नालासोपारा विधानसभेसाठी त्यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. माझी सगळी सेवा मुंबईत गेली. बाळासाहेबांची माझे चांगले संबंध होते. मला ते मुलासारखे मानायचे. अतिरेक्यांशी लढताना किंवा कारवाई केल्यानंतर ते कौतुक करायचे. उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत, शिवसेना मला जवळची वाटते म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जो माणूस माझ्याकडे बाहेर उभा राहायचा तो माणूस नंतर गृहमंत्री झाला. साहेब, मला हे त्रास देतात असं म्हणणारा माणूस नंतर गृहमंत्री झाला. तो गृहमंत्री होता त्यावेळी मी निलंबित होतो, असेही शर्मा एका नेत्याचे नाव न घेता म्हणाले.
मला एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणणं आवडत नाही. मी एन्काऊंटर शब्दाच्या विरोधात आहे. मीडियाने हा शब्द तयार केला. यासाठी पोलीस ऑपरेशन हा शब्द आहे, असेही ते म्हणाले. एन्काऊंटर करणं किंवा माणसांना मारणं मला आजिबात आवडत नव्हतं मात्र काही प्रसंग असतात, ज्यावेळी देशासाठी, लोकांसाठी असं पाऊल उचलावं लागत, असं शर्मा म्हणाले.
मी ब्राह्मण परिवारातून आहे. माझे आजोबा वगैरे पूजा करायचे. गुन्हेगाराला मारल्यावर आजिबात आनंद वाटत नाही. मी काय कुठल्याही अधिकाऱ्याला एन्काऊंटर आवडत नाही. मलाही हे आवडत नाही पण तो एक अॅक्सीडेन्ट असतो. समोरून हल्ला केल्यावर पर्याय नसतो, असेही ते म्हणाले. एन्काऊंटरचा मेसेज कुणी देत नाही, परिस्थितीनुसार कारवाई करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement