Telangana Exit Poll 2023 : तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना काँग्रेस धक्का देणार, सत्ता परिवर्तन जवळपास निश्चित, एबीपी C Voter Exit Poll
Telangana Exit Poll 2023 : तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Telangana Election Result 2023 : हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 साठी (Telangana Vidhan Sabha Election 2023) आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Telangana Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे.
तेलंगणा एक्झिट पोल (Telangana Exit Poll 2023)
एबीपी सी वोटरच्या अंदाजानुसार तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना सत्ता टिकवणं आव्हानात्मक आहे. काँग्रेस सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
- बीआरएस (BRS) - 46
- काँगेस - 57
- भाजप - 09
- इतर -07
- एकूण = 119
2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती
महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 2014 साली स्थापन झालेल्या तेलंगाणामध्ये स्थापनेपासून भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samiti) सत्ता आहे. आणि त्याच पक्षाचे के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योगांना दिलेली सूट आणि मध्यम वर्गांमध्ये आकर्षक असा चेहरा असलेल्या केसीआर यांना पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास जाहीर केलं आहे. मात्र, त्यांना कडवं आव्हान दिलंय, काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी.
भारत जोडोचा फायदा होणार? (Congress Bharat Jodo Yatra)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा कर्नाटकात झाला. तसाच फायदा तेलंगाणातही होईल असा विश्वास काँग्रेसला आहे. शिवाय, केसीआर यांच्याविरोधातली नाराजीही काँग्रेसच्या फायद्याची ठरु शकते. असं असलं तरी ओवैसींची एमआयएम आणि भाजपलाही विसरुन चालणार नाही. तुलनेनं दोन्ही पक्षांचं इथं अस्तित्व फार नाहीय. मात्र, यावेळी स्थिती बदलली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना महत्व येण्याची शक्यता नाकरता येणार नाही. 119 जागांपैकी 60 जागांचा आकडा कोणता पक्ष गाठणार. हे 3 डिसेंबरला कळेल.
2018 मध्ये चंद्रशेखर राव यांचं वर्चस्व (Telangana Election result 2018)
सध्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष TRS ला 2018 मध्ये (पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती वरून बदलून 2022 मध्ये भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले) सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर विधानसभेच्या 119 जागांपैकी सत्ताधारी पक्षाकडे सध्या 101 आमदार आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमकडे 7 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 5, भाजपकडे 3, एआयएफबीकडे एक, एक नामनिर्देशित आणि एक अपक्ष आमदार आहे.