एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Exit Polls : लोकसभेच्या मिनी फायनलमध्ये कोण बाजी मारणार? पाच राज्यामधील एक्झिट पोल अंदाज समोर!

Exit Poll : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत.

ABP Cvoter Exit Poll Result : लोकसभेची मिनी फायनल समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. इंडिया टुडे, माय अॅक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला 106-116, काँग्रेसला 111-121 आणि इतरांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात 230 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 116 जागांची गरज आहे.

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. तेथील मतांची टक्केवारी 76.31 टक्के होती. जी 2018 च्या तुलनेत (76.88) किरकोळ कमी होती. याठिकाणी पहिल्या टप्प्यात 20 जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या निकालापूर्वी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत, त्यापैकी 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा आहे.  

छत्तीसगडमध्ये काय अंदाज? (Chhattisgarh Exit Polls 2023) 

छत्तीसगडच्या (Chhattisgarh Exit Polls 2023) एक्झिट पोलच्या (Exit Poll) निकालानुसार काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली आहे. एबीपी सी व्होटर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला कौल देण्यात आला आहे. याठिकाणी 41 ते 53 जागा, तर भाजपला 36 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना मिळू शकणाऱ्या जागांचे आकडे 1 ते 5 पर्यंत आहेत. अॅक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 40-50, भाजपला 36-46 आणि इतरांना 1 ते 5 जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे 71, भाजपचे 13, बसपचे 2 आणि अजित जोगी यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. एक जागा रिक्त आहे. काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले होते.

छत्तीसगड एक्झिट पोल एबीपी सी वोटर (Chhattisgarh exit poll ABP C Voter  2023) 

  • काँग्रेस - 41 ते 53
  • भाजप - 36 ते 48
  • इतर - 1 ते 4
  • एकूण - 90

राजस्थानमध्ये काय स्थिती? (Rajasthan Exit Polls 2023) 

'जन की बात'च्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपला 100-122 जागा, काँग्रेसला 62 ते 85 जागा देण्यात आल्या आहेत आणि इतरांना एकही जागा देण्यात आलेली नाही. राज्यात एकूण 200 जागा आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याची प्रथा आहे. 2018 मध्येही हा ट्रेंड कायम राहिला. राज्यात विधानसभेच्या 200 जागा आहेत. 2018 मध्ये येथे विधानसभेच्या 199 जागांसाठी निवडणूक झाली होती. अलवरच्या रामगढ मतदारसंघातील बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

राजस्थान एक्झिट पोल (Rajasthan Exit Poll ABP C Voter) 

  • काँग्रेस - 81
  • भाजप - 104
  • बसपा - 00
  • इतर - 14
  • एकूण - 199

199 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 99 तर भाजपला 73 जागा मिळाल्या. एक जागा मिळालेल्या काँग्रेसला येथे आरएलडीने पाठिंबा दिला. अशा प्रकारे काँग्रेसने 100 जागा मिळवून सरकार स्थापन केले. नंतर, 2019 मध्ये झालेल्या रामगढ जागेच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आणि काँग्रेसला 101 जागांवर नेले. काँग्रेसने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केले.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh Exit Polls 2023) 

2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा 116 आकडा गाठला आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे सरकार केवळ 15 महिने टिकू शकले. ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या 22 आमदारांनी राजीनामा दिला. यामध्ये 6 मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे स्वतः भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कोर्टाने कमलनाथ यांची फ्लोर टेस्ट करण्याचे आदेश दिले. चाचणीपूर्वी कमलनाथ यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपने बंडखोर आमदारांचे विलीनीकरण केले आणि शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

तेलंगणा (Telangana Exit Polls 2023) 

तेलंगणात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. सध्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष TRS (पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती वरून बदलून 2022 मध्ये भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले) यांना सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर विधानसभेच्या 119 जागांपैकी सत्ताधारी पक्षाकडे सध्या 101 आमदार आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमकडे 7 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 5, भाजपकडे 3, एआयएफबीकडे एक, एक नामनिर्देशित आणि एक अपक्ष आमदार आहे.

मिझोराम (Mizoram Exit Poll 2023)

मिझोराममध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (MNF) 10 वर्षांनी परतले. एकूण 40 जागांवर झालेल्या निवडणुकीत एमएनएफला 26 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. याशिवाय झोराम पीपल्स मूव्हमेंटला 8 जागा मिळाल्या. एक जागा भाजपच्या खात्यात गेली. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाने झोरमथांगा यांना मुख्यमंत्री केले. विधानसभेच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे तर मिझो नॅशनल फ्रंटकडे सध्या २८ आमदार आहेत. काँग्रेसचे पाच, झोराम पीपल्स मूव्हमेंटचे एक, भाजपचे एक आणि पाच अपक्ष आहेत.

मिझोराम एक्झिट पोल - ABP C Voter  Mizoram Exit Poll 2023 

एमएनएफ - 18
काँग्रेस - 05
झेडपीएम - 15 
इतर - 02

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30: 06 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour : चंद्राबाबू, नितीशकुमार नरेंद्र मोदींची साथ सोडणार ?Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेटUdayanraje - Shivendraraje: विजयानंतर साताऱ्यात राजेंची भेट, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना गोड पापा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
Embed widget