एक्स्प्लोर
'मी कुठल्याच बँकेचा संचालक नव्हतो, गुन्हा दाखल झाल्यास स्वागत'-शरद पवार
महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कर्ज वाटपातील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ७६ जणांवर याआधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईनं, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

मुंबई: शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपप्रकरणी 'ईडी'कडून शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान, "मी कधीच कुठल्याही सहाकरी बँकेचा संचालक नव्हतो, मात्र माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी स्वागत करतो", अशी पहिली प्रतिक्रिया पवार यांनी या कारवाईनंतर माध्यमांना दिली. सध्या सुरू असलेल्या आपल्या दौऱ्यांमुळे धास्तावून सरकारनं ही कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 76 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींचा आकडा 300च्या घरात जाण्याची शक्यता देखील तक्रारदारांच्या वकिलांनी वर्तवलीय. दरम्यान, शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झालेत. धनंजय मुंडे, जीतेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,
रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवाँ बदलता है जज्बा रखो जीतने का क्यूंकि किस्मत बदले न बदले पर वक्त जरुर बदलता है...@BJP4Maharashtra — Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 24, 2019
संबंधित बातम्या- महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल, शरद पवारही अडचणीत?परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते!!
याचा अर्थ कळतो काय तुला महाराष्ट्रा? — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 24, 2019
आणखी वाचा




















