एक्स्प्लोर
Advertisement
लोकसभेचे मतदान झालेल्या दुष्काळग्रस्त भागात आचारसंहिता शिथिल करा, किशोर तिवारींची मागणी
दुष्काळग्रस्त विदर्भ मराठवाड्यात 10 मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केल्यापासून दररोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या काळात हा आकडा 292 वर गेला आहे, असा दावा तिवारी यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यात दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भातील सर्व तर मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघातील निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त भागातील आदर्श आचारसंहितेला तात्काळ शिथिल करावी, अशी मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.
याबाबत किशोर तिवारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा देखील केली आहे. दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात 10 मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केल्यापासून दररोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या काळात हा आकडा 292 वर गेला आहे, असा दावा तिवारी यांनी केला आहे.
अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, रोजगार, पाणी, चारा आणि नवीन पीककर्ज याबाबतचे प्रश्न निवडणुकीचे काम समोर करून सनदी अधिकारी, कर्मचारी टाळत आहेत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय वळगता मदत पुनर्वसनाच्या कामाना गती देण्याकरता लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यात निवडणूक झालेल्या भागात आदर्श आचारसंहितेला शिथिल करण्याची गरज आहे, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
10 मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यांनतर विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांचे पाणी, चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्यानंतर मदत पुनर्वसनच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात? अशी विचारणा केल्यावर अधिकारी निवडणूक आयोग आणि आचारसंहितेचे कारण समोर करत आहेत. यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगसमोर आणला.
चारा आणि पाणी नसल्यामुळे विदर्भ तसंच मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत आहेत. त्यातच रोजगार हमी योजनेची कामंच उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड उपासमार होत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement