एक्स्प्लोर
सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील
मला अद्याप पक्षाची नोटीस मला मिळाली नाही, नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडण्यावर भाष्य करू, असेही ते म्हणाले.
अहमदनगर : साडेचार वर्ष पक्षासाठी मेहनत घेतल्यानंतर शेवटच्या क्षणी जागा सोडण्यावरून राजकारण झाले. निवडून येण्याची शक्यता असल्याने सुजयसाठी तिकीटाची मागणी केली होती. मात्र आमच्याच पक्षातील नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली. यासंदर्भात दिल्लीला झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी म्हणतेय तर सुजयने राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक होतं, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
निवडणूक झाल्यानंतर कार्यकत्यांची बैठक घेणार असून राज्यातील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजकीय भूमिका ठरवणार असल्याचे ते म्हणाले तोवर पाण्याच्या प्रश्नावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मला अद्याप पक्षाची नोटीस मला मिळाली नाही, नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडण्यावर भाष्य करू, असेही ते म्हणाले.
अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी माझा आग्रह होता. त्यावेळी राष्ट्रवादी जागा सोडायला तयार होती. मात्र सुजयने राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं राष्ट्रवादीकडून सांगितलं गेलं. राहुल गांधीनी देखील राष्ट्रवादीकडून उभे राहण्याची सूचना केली, हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला असं सुचवतात. मागे उभे राहण्याऐवजी त्यांनी ही सूचना केल्याने धक्का बसला. साडेचार वर्षाच्या कामाचे फलित हेच का? असा सवाल विखे पाटील यांनी केला.
विखे पाटील म्हणाले की, एवढी वर्ष पक्षासाठी तन मन धनाने काम केलं. प्रत्येक वेळी काँग्रेस कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाच्या वेळी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढलो. याचा फायदा पक्षाला झाला निवडणुकांच्या निकालात झालेला दिसून आला. माझ्यामुळे सरकारला कर्जमाफी मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळो लावून धरले, लोकहिताच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राजीनामा देण्यासंबंधात १५ मार्चला राहुल गांधींना मी पत्र पाठवलं. काहीतरी नैतिकता ठेवावी म्हणून सुजय भाजपत गेल्यावर विरोधी पक्षनेते पदावर राहणे योग्य नाही, असं ठरवून हा निर्णय मी घेतला. डॉ . सुजयच्या प्रचाराला जायचं नाही हे देखील ठरवलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची आमच्याविषयीची भावना काय ते शरद पवारांच्या वक्तव्यावरून दिसून आलं होतं. आम्ही राजकीय आत्महत्या करायची होती का?, असं विखे यावेळी म्हणाले.
पवारांच्या मनात पूर्वग्रहदूषित भावना होती, बाळासाहेब विखेंबद्दलच त्यांचं विधान वेदनादायी होतं, शेवटी व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आल्याने मुलाच्या पाठीमागे उभे राहिलो, असेही ते म्हणाले.
विधिमंडळ पक्षाचा नेता असूनही पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही, याच शल्य आहे. मी काँग्रेसचा स्टार प्रचारक होतो. मात्र प्रचाराला गेल्यावर राष्ट्रवादीचे लोक बहिष्कार घालतील आणि म्हणून त्या उमेदवाराचं नुकसान होऊ नये म्हणून प्रचारक असतानाही प्रचाराला गेलो नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
काही घडलं तर ती विखेंचीच चूक हे काही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर बिंबवलं. मला राजीनामा मंजूर केला याच दुःख नाही. मी पक्षाला गालबोट लागेल असं काही केलं नाही, तडजोडी केल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत मैत्रीची अफवा उठवली गेली, त्यांचा मी व्यक्तिगत फायदा कधीच घेतला नाही, असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement