एक्स्प्लोर
जो व्यक्ती स्वत:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार, प्रकाश आंबेडकरांचं मोदींवर टीकास्त्र
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार कारु नान्हे यांच्या प्रचाराकरीता भंडारा शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला.
भंडारा : वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष केलं आहे. ‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. भंडाऱ्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकरांनी असं वक्तव्य केल आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार कारु नान्हे यांच्या प्रचाराकरीता भंडारा शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच त्यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.
आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीने उमेदवार लढविल्याने प्रफुल पटेल आणि शरद पवार यांनी स्वत: निवडणूक लढविली नाही.
UNCUT | मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यात, प्रकाश आंबेडकरांचं भाषण | पंढरपूर | एबीपी माझा
प्रकाश आंबेडकर सोलापूरातून निवडणूक लढवणार
सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. कारण आपण सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती?
(प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर, आणि मुलगा सुजात आंबेडकर))
करप्राप्त उत्पन्न
*आर्थिक वर्ष 2014-15
प्रकाश आंबेडकर - 1 लाख 61 हजार 100 रुपये
अंजली आंबेडकर - 12 लाख 95 हजार 60 रुपये
*आर्थिक वर्ष 2018-19
प्रकाश आंबेडकर - 8 लाख 60 हजार 190 रुपये
अंजली आंबेडकर - 21 लाख 09 हजार 140 रुपये
*जंगम मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 41 लाख 81 हजार 189 रुपये
अंजली आंबेडकर - 73लाख 86 हजार 273 रुपये
सुजात आंबेडकर - 9 लाख 55 हजार 454 रुपये
*स्थावर मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 32 लाख
अंजली आंबेडकर - 1 कोटी 15 लाख
संयुक्त - 3 कोटी 15 लाख
*मालकीचं एकही वाहन नाही
*कोणत्याही स्वरुपाचं कर्ज नाही
*फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि वेबसाईट आहे
VIDEO | प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका | भंडारा | एबीपी माझा
संबंधित बातम्या
9 रुपये उत्पन्न असलेला 'हा' उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांना देणार टक्कर
आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती?
सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंना प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
लोकसभा निवडणूक : वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमसाठी दोन जागा सोडल्या
मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर
राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement