एक्स्प्लोर
हिंमत असेल तर लोकसभा लढवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान
उमेदवारी अर्ज भरायला आणखी एक दिवस बाकी आहे, तुम्ही स्वतः मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा, अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना जाहीर आव्हान दिलं.

बीड : धनंजय मुंडे तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक का लढवत नाही? असा सवाल महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. आणखी एक दिवस उमेदवारी अर्ज भरायला बाकी आहे, तर तुम्ही स्वतः मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना प्रचार सभेत जाहीर आव्हान दिलं आहे. राज्याचं नेतृत्व करतो, असं म्हणणारे मागच्या दाराने येतात, स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान दिलं. मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा सवालही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केला. धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही, धनंजय मुंडेंचं भावूक विधान बीडमध्ये रॅली काढून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर बीड शहरातील माने कॉम्प्लेक्सजवळ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राम शिंदे, शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, रासप नेते महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. व्हिडीओ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आला. पण यावेळी ठेवण्यात आलेली जाहीर सभा राष्ट्रवादीकडून रद्द करण्यात आली. यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारल्याचं कारण धनंजय मुंडेंनी सांगितलं. 'बोलवलेले नेते येणार नसल्याने राष्ट्रवादीची आजची सभा रद्द करावी लागली. मात्र आरोप आमच्यावर करतात. त्यांचा रडीचा डाव लहानपणापासून माहीत आहे, मात्र आपण बोलत नाही. माझ्यावर ते नेहमी टीका आणि आरोप करतात. विशेष म्हणजे मी कोणाला घाबरत नाही, असंही पंकजा म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
पोटी जन्म घेतला म्हणून वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर टीका
पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालविकास विभागात 106 कोटींचा मोबाईल घोटाळा, धनंजय मुंडेंचा आरोप
आणखी वाचा




















