एक्स्प्लोर
काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना माझं एकही काम केलं नाही : उदयनराजे भोसले
गेली 25-30 वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. सोलापुरातील भाजपच्या मेगा भरतीत उदयनराजे भाजप प्रवेश करतील असं बोललं जात होतं मात्र त्यांचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं समोर येत आहे. माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मी याबाबत विचार करुन निर्णय घ्या, असं सांगितल्याची महिती उदयनराजेंनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना दिली आहे.
येत्या काळातील राजकीय वाटचालीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काल उदयनराजेंच्या समर्थकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, "जे काही होईल ते लोकांच्या हिताचं होईल. माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही विचार करुन निर्णय घ्या आणि मला सांगा असं मी सांगितलं आहे. गेली 25-30 वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत", असं उदयनराजे म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी माझं एकही काम केलं नाही. मी सांगून कंटाळलो पण काम झालं नाही', असा आरोपही यावेळी उदयनराजेंनी केला आहे. "आम्ही लोकांकरिता लढलो, रस्तारोको केला, आमच्यावर केसेस झाल्या. काही कारण नसताना माझ्यावर खंडणीची केस दाखल झाली. 302,307 सारखे गुन्हे दाखल झाले. खोट्यानाट्या केसेस झाल्या", असं उदयनराजे म्हणाले.
तसेच 'राजकारण सुरु असतं. सत्ता इकडची तिकडं जाते, मंत्री बदलतात. मी सत्तेचा कधी अट्टहास केला नाही. मेगाभरतीला मी भीक घालत नाही, आम्हाला गरज पण नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात चंद्रकांतदादांचा खोडा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement