एक्स्प्लोर

मी कोठूनही लढायला तयार! अभिजीत पाटलांचे माढ्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत 

Abhijit Patil : मी माढ्यात (Madha) आताही येणार आणि परत सहा महिन्यानेही येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी केलं आहे.

Abhijit Patil : माझी लढायची तयारी कोठूनही आहे. मी माढ्यात (Madha) आताही येणार आणि परत सहा महिन्यानेही येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी केलं आहे. एका कार्यक्रमानिमित्त ते माढा तालुक्यातील उंदरगावात आले होते. यावेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी माढा विधानसभा निवडणूक (Madha Assembly Constituency) लढवावी अशी मागणी केली. यावेळी मी कोठूनही लढायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळं अभिजीत पाटील हे माढा विधानसभेची निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. माढ्यात चांगल्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी चांगले रस्ते नाहीत मग विकास कुठे झाला असे म्हणत पाटील यांनी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) यांचे नाव न घेता टीका केली. 

तुमच्या मनातील गोष्ट करण्यासाठी लवकरच येऊ

तुमच्या मनातील गोष्ट करण्यासाठी लवकरच येऊ असे म्हणत माढा विधानसभा लढवण्याचे संकेत अभिज पाटलांनी दिले आहेत. दरम्यान, तुम्ही घाबरु नका तुम्हाला उसाला कोणाच्याही दारात जाऊ देणार नाही. तुमचा सगळा ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला नेला जाईल असे पाटील म्हणाले. विठ्ठल कारखान्यावर 600 कोटी रुपयांचं कर्ज असतानाही मी चांगला दर दिला. मग जे कारखाने नफ्यात आहेत, त्यांना दर द्यायला काय अडचण? असे सवालही पाटील यांनी केले. 

तुम्हाला उजनी धरणाचं पाणी कोणी दिलं?

अनेकजण सांगतात की उजनी धरणाचे पाणी सीना नदीला माझ्यामुळं आलं. पण त्यांना पाणी कोणी दिलं? त्या पाण्याचा उगम कोठून झाला असं म्हणत अभिजीत पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना टोला लगावला. उजनी धरणाच्या कामात आजही शरद पवार यांचेच नाव घेतले जाते. युतीच्या काळात या कामाला मंजुरी मिळाली होती. उजनी धरणाच्या कामाची कुदळ यशवंतराव चव्हाण यांनी मारली होती. त्यांना विसरणे चुकीचं असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. 

मी ट्रॅक्टरला उट्या लावून पुढे आलोय

साखर कारखाना कधीपर्यंत चालतो हे देखील काही लोकांना माहीत नाही. ते लोक अपघाताने राजकारणात पुढे आले आहेत. आम्ही ट्रॅक्टरला उट्या लावून पुढे आलो आहोत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मागील वर्षी काही लोक म्हणाले अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना मार्च महिन्यापर्यंत चालत नाही. पण विठ्ठल कारखाना मार्चपर्यंत सुरु राहिल्याचे पाटील म्हणाले. 2007 साली ज्या साखर कारखान्याला माझी एक टोळी होती, आज मी त्याच साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे पाटील म्हणाले. 

पाच वर्षात मी पाच कारखाने उभा केले, त्यामुळं आडवे अनेकजण येणार

आज मी सहा साखर कारखाने चालवत आहे. एवढे साखर कारखाने चालवत आहे म्हणल्यावर आडवे अनेकजण येणार असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. पाच वर्षात मी पाच कारखाने उभा केले आहेत. त्यामुळं अनेकजण आडवे येणार आहेत. माझ्यामागे Ed लावली, पण उद्योग मोठा आहे, त्यामुळं मी देखील हिशोब ठेवल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. मी चुकीचं काही केलं नाही तर त्यामुळं घाबरायचे कारण नसल्याचे पाटील म्हणाले. 

6 वेळा शरद पवारांनी संधी देऊनही तुम्ही त्यांची साथ सोडली

अलिकडच्या काळात निष्ठा राहिली नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला,  शरद पवार यांचा देखील पक्ष फोडला. शरद पवार यांना बाप म्हणणाऱ्या लोकांनीच त्यांची साथ सोडली असं  म्हणत अभिजीत पाटलांनी अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 6 वेळा तुम्हाला आमदारकीची संधी दिली तरी तुम्ही पवारांची साथ सोडली, हे दुर्दैवी असल्याचे म्हणत अभिजीत पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांंना टोला लगावला. मी अनेकांचं गणित बिघडवलंय. त्यामुळं अनेकजण गरळ बाहेर काढत आहेत. मी अनेकांचा खिसा कमी केलाय. याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. येणाऱ्या काळात आपण संघर्ष करु, शरद पवारांच्या पाठिशी उभं राहू असे अभिजीत पाटील म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget